शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीतील महिलांचे अश्लील व्हिडीओ शूट करणारा जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:01 IST

पोलिसांनी अविनाशला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

ठळक मुद्देठाणे येथील कापूरबावडी परिसरातील एका सोसायटीत अविनाशने मे महिन्यात रुम भाड्याने घेतली होतीपोलिसांना आरोपीजवळील मोबाइलमध्ये २९४ अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले आहेत.

ठाणे - सोसायटीतील महिलांचे अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या अविनाश कुमार यादव (३४) या तरूणाला कापूरबावडी पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांना आरोपीजवळील मोबाइलमध्ये २९४ अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले आहेत. पोलिसांनी अविनाशला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. 

ठाणे येथील कापूरबावडी परिसरातील एका सोसायटीत अविनाशने मे महिन्यात रुम भाड्याने घेतली होती. दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो त्या रूमवर पत्नीसह रहायला आला होता. आयआयटी दिल्लीतून शिक्षण पूर्ण करून तो आयआयटी मुंबईत पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री - अपरात्री सोसायटीच्या परिसरात तो संशयास्पद फिरायचा. त्यामुळे सोसायटीत रहायला आल्यापासूनच अविनाशवर अनेकांना संशय होता. 

शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास अविनाश सोसायटीच्या मागील बाजूला फेऱ्या मारत होता. काही वेळाने तो सोसायटीतल्या तळमजल्यावरील एका घरातील बाथरूमची लाइट लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन मोबाइलनेचित्रीकरण करू लागला. त्यावेळी त्याच्या मोबाइलची फ्लॅश लाइट सुरू राहिल्यामुळे बाथरूममधील व्यक्तीला ही बाब लक्षात आली. त्या व्यक्तीने आरडाओरडा केला. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अविनाशला रंगेहाथ पकडलं. त्याचा मोबाइल तपासला असता त्याच्या मोबाइलमध्ये सोसायटीतील काही महिलांचे अश्लील व्हिडीओ होते. सोसायटीतील नागरिकांनी तातडीने कापूरवाडी पोलिसांना बोलावून अविनाशला स्वाधीन केलं. पोलीस तपासात अविनाशच्या मोबाइलमध्ये २९४ अश्लील व्हिडीओ, फोटो आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी अविनाश विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे