शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलांच्या आईचं 2 तरूणांसोबत सुरू होतं अफेअर, दोघांनी मिळून उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 09:31 IST

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांसाठी सगळ्यात मोठं आव्हान हे जाणून घेणं होतं की, महिला कोण आहे?

Crime News : गुजरातच्या वडोदरामधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे दोन प्रियकरांनी मिळून आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पुलाखाली नेऊन फेकला. मीडिया रिपोर्टनुसार, महिला विवाहित होती आणि तिला तीन मुलंही आहेत. ती पतीपासून वेगळी राहत होती. पोलिसांनी घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांसाठी सगळ्यात मोठं आव्हान हे जाणून घेणं होतं की, महिला कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी महिलेचा फोटो काही परिसरांमध्ये दाखवला. यादरम्यान पोलिसांना समजलं की, ही महिला रनौली बस स्टॅंडजवळ राहते. पोलीस तिथे पोहोचले तर घर रिकामं होतं.

घरात महिलेची कागदपत्रे सापडली ज्यात तिचं नाव चमेली होतं. तिच्यासोबत अजय यादव नावाचा एक तरूणही राहत होता. जो चार दिवसांपासून गायब होता. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये डिसेंबरपासून राहत होते. पोलिसांना हे समजलं की, अजय यूपीचा राहणारा आहे. त्याला गावाहून लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो चमेलीला सोडून आपल्या गावी गेला. यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं.

काही दिवसांआधी चमेली प्रियकर अजय यादवचा मित्र उदय शुक्लाच्या संपर्कात आली. दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले होते. दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. उदय विवाहित होता आणि चमेली त्याच्यावरही लग्नासाठी दबाव टाकत होती. यामुळे उदय वैतागला होता. त्याला चमेलीपासून पिच्छा सोडवायचा होता.

उदयने हे सगळं मित्र अजयला सांगितलं. मग दोघांनी मिळून चमेलीचा काटा काढण्याचा प्लान केला. यासाठी त्यांनी व्हॅलेंटाईन डे ची निवड केली. उदय शुक्ला आपल्या बाईकवरून चमेलीला पदमला गावातील मिनी नदीवर घेऊन गेला. जिथे अजय आधीच त्यांची वाट बघत होता. दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळला आणि मृतदेह पुलाखाळी फेकला. बऱ्याच शोधानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी