शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक पार्टनरकडे जाण्यासाठी अडून बसली विवाहित महिला, सासरी गेलीच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 12:18 IST

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, तरूणी विवाहित आहे. पण ती एकदाही तिच्या सासरी गेली नाही.

Crime News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामध्ये मुलीच्या वागण्याला वैतागून आई-मुलाने आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारची आहे. इथे एका आईला मुलीच्या वागण्यामुळे आत्मदाह करण्याचा प्रयत्न करावा लागला. समलैंगिक असल्याचं सांगून विवाहित तरूणी आपल्या प्रेमाजवळ जाण्याच्या हट्ट करत होती. यादरम्यान पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज  ड्रामा झाला. पोलिसांनी कसंतरी प्रकरण शांत केलं.

नंदगाव येथील एका कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरूणीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून पोलिसांना एक निवेदन दिलं होतं. पोलिसांकडे तिने तिच्या परिवारापासून वेगळं होण्यासाठी एक निवेदन दिलं होतं. ज्यानंतर पोलीस तरूणीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. सोबतच तिचा भाऊ आणि आई सुद्धा आली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर तरूणीच्या आईने आणि भावाने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला. हे बघून पोलीस हैराण झाले. पोलिसांनी लगेच त्यांच्याकडून माचिस आणि कॅन हिसकावून घेतली. ज्यानंतर दोघांना शांत करण्यात आलं.

पोलिसांनी सांगितलं की, तरूणी विवाहित आहे. पण ती एकदाही तिच्या सासरी गेली नाही. तरूणी गोरखपूरच्या एका तिच्याच वयाच्या मुलीच्या प्रेमात होती. तिने पोलिसांना सांगितलं की, ती समलैंगिक आहे आणि तिला तिच्या प्रेयसीकडे गोरखपूरला जायचं आहे. त्यासाठी तिने परिवारापासून वेगळं होण्याचं निवेदन दिलं. तरूणी म्हणाली की, तिला तिच्या परिवारासोबत रहायचं नाहीये. तिला जबरदस्ती सासरी पाठवलं जात आहे. तिला सासरी जायचं नाहीये.

पोलिसांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. परिवार तिला विरोध करत आहे. परिवारातील लोक म्हणाले की, ती तिचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. पोलिसांनी सांगितलं की, आधीही याबाबत माहिती दिली गेली होती. पोलीस सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी