शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित, २ मुलांचा बाप...काँग्रेस नेत्या हिमानी नरवालला आयुष्यातून संपवणारा आरोपी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:48 IST

पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाला सुरूवात केली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

रोहतक - हरियाणाच्या रोहतक येथील जिल्हा काँग्रेस नेत्या हिमानी नरवालची हत्या करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. या आरोपीची पोलीस चौकशी सुरू आहे. तपासात आरोपी सचिनने अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पोलीस याबाबत दुपारी पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहे. हिमानी नरवाल काँग्रेसची सक्रीय कार्यकर्ता होती. तिचा मृतदेह सांपाला बस स्टँडजवळील एका सुटकेसमध्ये आढळल्यानं खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाला सुरूवात केली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

कोण आहे आरोपी सचिन?

पोलिसांनी या प्रकरणात ज्या आरोपीला अटक केली आहे त्याचे नाव सचिन आहे. सचिन बहादूरगडच्या खैरपूर गावातील रहिवासी आहे. त्याचे वय ३२ वर्ष असून त्याला २ मुले आहेत. त्याने प्रेमविवाह केला होता. सचिनचे वडील ड्रायव्हर आहेत तर सचिन कनौदा गावात मोबाईल दुरूस्तीचं दुकान चालवतो. पोलीस सचिनची चौकशी करत आहेत. त्याची भूमिका आणि या हत्याकांडात सहभागी अन्य लोकांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. 

आरोपी पोलिसांच्या तावडीत कसा सापडला?

हिमानी नरवाल हत्येचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने विजयनगर ते सांपलापर्यंत १२८ सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यात एक फुटेज हिमानीच्या घराजवळील आढळला. त्यात एक युवक सुटकेस घेऊन जाताना दिसतो. सीसीटीव्ही फुटेज फार दूरचे असल्याने युवकाचा चेहरा फारसा दिसत नव्हता. मात्र तरीही पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं. हिमानीच्या घरीच तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय होता त्यानंतर मृतदेह सुटकेसमधून बस स्टँडजवळ फेकण्यात आला त्या अँगलने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

दरम्यान, काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या आईने मुलीचा खून केलेल्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली आहे. माझी मुलगी माझ्यापासून काही लपवत नाही. मला प्रत्येक गोष्ट सांगते. पैशांच्या बाबतही ती माझ्याशी बोलते. पक्षातील दुसरे नेतेही मुलीला पैसे देण्यासाठी तयार होते परंतु माझ्या मुलीने आजपर्यंत कुणाकडून पैसे घेतले नाहीत असं सांगत मुलीच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा द्या असं हिमानीच्या आईने मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी