शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पत्नीनं शेअर केला लग्नाचा फोटो, डॉक्टर पतीची झाली पोलखोल; WhatsApp चॅटिंगनं डाव फसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:26 IST

राज्यातील सर्वात मोठं हॉस्पिटल रिम्सचे डॉ. कुश कुमारवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरचा खरा चेहरा पत्नीने त्याच्या गर्लफ्रेंडसमोर उघडकीस आणल्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठलं१० वर्ष ज्या मुलीसोबत डॉक्टर रिलेशनशिपमध्ये होते तिलाही त्यांचे लग्न झाल्याची भनक लागली नाही डॉक्टरांचे आधीच लग्न झालंय याबद्दल पीडित मुलींना कुठलीही कल्पना नव्हती.

झारखंडच्या रांची येथील रिम्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा खरा चेहरा पत्नीसमोर उघड झाला आहे. डॉक्टरच्या पत्नीनं मोबाईलमधील चॅट पाहून लग्न झालेला फोटो शेअर केला. हा फोटो डॉक्टरांच्या दोन्ही गर्लफ्रेंडनं पाहिला. त्यानंतर गोंधळ उडाला. दोन्ही गर्लफ्रेंड थेट पोलीस ठाण्यात पोहचली आणि डॉक्टरांवर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात FIR नोंदवली.

राज्यातील सर्वात मोठं हॉस्पिटल रिम्सचे डॉ. कुश कुमारवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. पीडित मुली म्हणतात की, डॉक्टरांनी लग्नाचं आमिष दाखवून आमच्यासोबत संबंध ठेवले. मागील १० वर्षापासून डॉक्टर माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत असा आरोप एका मुलीने केला. तर दुसऱ्या पीडितेसोबत डॉक्टरांचे गेल्या ३ वर्षापासून संबंध आहेत. डॉक्टरांचे आधीच लग्न झालंय याबद्दल पीडित मुलींना कुठलीही कल्पना नव्हती.

१० वर्ष ज्या मुलीसोबत डॉक्टर रिलेशनशिपमध्ये होते तिलाही त्यांचे लग्न झाल्याची भनक लागली नाही. अलीकडेच डॉक्टरच्या पत्नीला नवऱ्याच्या हालचालींवर संशय आला. एकेदिवशी तिने नवऱ्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट पाहिलं. पत्नीने डॉक्टरची हेरगिरी सुरू केली. त्यावेळी गर्लफ्रेंडसोबत डॉक्टरांनी केलेले चॅट तिने वाचले. त्यानंतर पत्नीने तिच्या लग्नाचा फोटो दोन्ही गर्लफ्रेंडसोबत शेअर केला. डॉक्टरांचे आधीच लग्न झाल्याचं कळताच दोन्ही गर्लफ्रेंडचं डोकं फिरलं. ज्याच्यासोबत लग्नाचं स्वप्न पाहत होत्या त्या डॉक्टरचे अधिक लग्न झाल्यानं या पीडिता संतापल्या.

डॉक्टरचा खरा चेहरा पत्नीने त्याच्या गर्लफ्रेंडसमोर उघडकीस आणल्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठलं. याठिकाणी दोन्ही मुलींनी डॉक्टरांवर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी या पीडित मुलींच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात फसवणूक करून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला. इतकचं नाही तर डॉक्टरांनी मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस