शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षांच्या मुलीचे 28 वर्षांच्या तरुणाशी लग्न, नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:56 IST

या अल्पवयीन मुलीचा विवाह बिहारमध्ये जानेवारीत करण्यात आल्यानंतर ती नवऱ्यासह मुंबईत चारकोप भागात राहावयास आली.

मुंबई : अवघ्या १२ वर्षांच्या मुलीशी २८ वर्षांच्या तरुणाचा त्या मुलीच्या कुटुंबीयांच्या संमतीने बालविवाह करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या संबंधात चारकोप पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत नवऱ्याला अटक केली आहे. ही मुलगी गरोदर राहिल्याने तिचा विवाह करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. 

या अल्पवयीन मुलीचा विवाह बिहारमध्ये जानेवारीत करण्यात आल्यानंतर ती नवऱ्यासह मुंबईत चारकोप भागात राहावयास आली. तेथे भाडेतत्त्वावर घर घेऊन ते राहत होते. या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिचा पती तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मुलगी गरोदर असून अल्पवयीन असल्याचा संशय त्यांना आला. तेव्हा याची माहिती त्यांनी चारकोप पोलिसांना दिली.

परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती बागूल-भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पुढील चौकशी सुरू केली. तेव्हा या मुलीचे वय अवघे १२ वर्षे ७ महिने आणि २३ दिवस असल्याचे उघड झाले. त्यानंतर, आरोपींविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत लगेचच त्याला अटक करण्यात आली. 

दोन्ही कुटुंबीयांवर कारवाई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते आता या प्रकरणात गुंतलेल्या दोन्ही कुटुंबांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. ज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणे समाविष्ट असू शकते. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.तपासादरम्यान समजले की आरोपी हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा तिचा नवरा आहे. ते १९ जूनपासून भाड्याच्या घरात राहायला आले. त्याने सरकारी रुग्णालयात दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला, असेही अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली चाकणकर यांनी सोमवारीच लातूरमधील एका पत्रकार परिषदेत कोविड-१९ च्या लॉकडाऊननंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी