शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक संबंध ठेवले म्हणून विवाह बंधनकारक नाही; बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 10:19 IST

कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले.तक्रारदार महिलेचे एका आरोपीवर प्रेम होते. आरोपीने तिच्याशी विवाह केला नाही. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला. अटक होईल या भीतीने आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

तक्रारदार ही सज्ञान आहे. सुशिक्षित आहे. त्यामुळे विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव तिला आहे. आपली फसवणूक करून सहमती घेण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मात्र, तसे दर्शविणारे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

तक्रारीनंतरही ठेवले शारीरिक संबंधआरोपींचा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, २०१९ मध्ये गुन्हा नोंदवेपर्यंत महिलेने आरोपीबरोबर अनेक ठिकाणी भेट दिली व त्याच्याबरोबर राहिलीही. तक्रार केल्यानंतरही ती आरोपीबरोबर अनेक ठिकाणी गेली व ठाण्यातील अनेक हॉटेल्समध्ये त्याच्याबरोबर राहिली. सदर प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीचे तक्रारदार महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यांच्यात असलेले शारीरिक संबंध हे एकमेकांच्या सहमतीनेच होते, हे निश्चित.

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिप