The marriage of a girl who was honored in the palace | वाड्यात मानपानावरून माेडले मुलीचे लग्न 

वाड्यात मानपानावरून माेडले मुलीचे लग्न 

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : लग्न जमल्यावर टिळा लावण्याच्या कार्यक्रमात मुलीकडच्यांनी याेग्य मानपान न केल्याचे कारण देत चक्क लग्न मोडल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह त्याचे आईवडील व काकाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरज पाटील (नवरा मुलगा), सुधाकर पाटील (वडील), नयना पाटील (आई), कमलाकर पाटील (काका) अशी आरोपींची नावे आहेत. ते भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील रहिवासी आहेत. 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुधाकर पाटील सध्या मुक्काम वसई यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या नीरज या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका उच्चशिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. हे लग्न जमण्यासाठी या मुलाचे काका कमलाकर पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्याअनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर ३० ते ४० लोकांच्या उपस्थितीत कुंकू लावण्याचा कार्यक्रम पार पडला होता.
यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलाच्या काकांना फोन करून कारण विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र काका कमलाकर याने फोन न उचलता कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर मुलीचे वडील व आपले एक-दोन नातेवाईक मध्यस्थांना घेऊन मुलाच्या वडिलांकडे गेले असता मुलाचे काका कमलाकर पाटील हे आलेल्या मध्यस्थांना व मुलीच्या वडिलांना भेटले नाहीत. 
आपली फसवणूक झाल्याचे नवरी मुलीच्या वडिलांच्या लक्षात आले. यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून फसवणुकीचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रूपाली गुंड तपास करत आहेत. या प्रकाराबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जेवण, भेटवस्तूही दिल्या
नवऱ्याकडील मंडळींचे नवरी मुलीच्या वडिलांनी येथोचित असे स्वागत केले. कपड्यांच्या भेटी दिल्या. जेवण घातले. मात्र दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली असता मुलाने त्यांना चक्क आपले जमणार नसल्याचे सांगितले.

Web Title: The marriage of a girl who was honored in the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.