शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नीरजच्या दुसऱ्या ‘सीम’मध्ये अनेक ‘राज’; २८ आमदारांहून अधिकांना संपर्क : ‘सीडीआर’वरच काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:30 IST

गुजरात व दिल्लीमध्ये वापरण्यात आलेल्या त्या ‘सिम’मध्ये त्याची अनेक गुपिते असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड याची सलग चौथ्या दिवशी गुन्हे शाखेकडून कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या मोबाइलचा तांत्रिक तपासही करण्यात येत आहे. आतापर्यंत एका सिमकार्डच्या ‘सीडीआर’च्या तपासातून त्याने २८ हून अधिक आमदारांना संपर्क केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मात्र त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या ‘सिम’ला अद्याप हात लावण्यात आलेला नाही. गुजरात व दिल्लीमध्ये वापरण्यात आलेल्या त्या ‘सिम’मध्ये त्याची अनेक गुपिते असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांशी बोलणाऱ्या नीरजने मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे, तसेच गोवा येथील आमदार प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आमदार बाशा चँग यांच्याशी संपर्क साधला होता. 

तपासादरम्यान हा आकडा वाढला व २८ हून अधिक आमदारांना संपर्क केल्याची बाब समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत. सद्य:स्थितीत त्याच्या मोबाइलमधील महिनानिहाय ‘सीडीआर’ तपासण्यात येत आहे. त्यातून आमदारांची नावे समोर आली आहेत. तपासात अडथळा नको म्हणून ही नावे गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुंभारेंकडून पुरावे घेतले  गुन्हे शाखेच्या पथकाने आमदार विकास कुंभारे यांच्याकडून नीरजच्या फोन कॉल्सशी संबंधित स्क्रीनशॉट्स, मेसेजेस व कॉल रेकॉर्डिंग असे पुरावे घेतले आहेत.   इतरही आमदारांना यासाठी संपर्क करण्यात येणार आहे.   सद्य:स्थितीत एकाही आमदाराला जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आलेले नाही.   अगोदर नीरजच्या फोनची पूर्ण तपासणी करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यानंतर आमदारांशी संपर्क साधण्यात येईल.

टॅग्स :BJPभाजपा