शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

तब्बल २५ हजार सायबर गुन्ह्यांचा छडा नाही, सात वर्षांत केवळ ९९ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:06 IST

Cyber Crime : सात वर्षांत २५ हजार गुन्ह्यांपैकी केवळ ६३०६ गुन्ह्यांची उकल करून त्यातील केवळ ९९ आरोपींना गृहविभाग कारागृहात पाठवू शकला. 

- अविनाश साबापुरे 

यवतमाळ : राज्यात स्मार्टफाेन, टॅब व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला असून, त्यातून गेल्या सात वर्षांत तब्बल २५ हजार ४६९ सायबर गुन्ह्यांची गृहखात्याकडे नोंद झाली. मात्र राज्यातील ४३ सायबर पोलीस ठाण्यांमध्ये सायबर तज्ज्ञांऐवजी नियमित पोलीसच काम करीत असल्याने त्यांच्याकडून या गुन्ह्यांची उकल होऊ शकली नाही. सात वर्षांत २५ हजार गुन्ह्यांपैकी केवळ ६३०६ गुन्ह्यांची उकल करून त्यातील केवळ ९९ आरोपींना गृहविभाग कारागृहात पाठवू शकला. 

सायबर गुन्हेगारीच्या संकटाबाबत खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी (दि. २२) खंत व्यक्त केली. मात्र, राज्यात ४३ ठिकाणी सायबर पोलीस ठाणी उभारली गेली असली तरी तेथे सायबर तज्ज्ञांची नेमणूक झालेली नाही. उलट नियमित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांनाच संगणकाचे जुजबी प्रशिक्षण देऊन त्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाला जुंपण्यात आले. सायबर गुन्ह्यात वापरलेल्या माध्यमांचे सर्व्हर भारताबाहेर असल्याने असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सायबर तज्ज्ञांची गरज असून, त्यांचीच पदे रिक्त असल्याने गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित आहे. 

लैंगिक अत्याचारांतील २११० सॅम्पल पडूनफाॅरेन्सिक लॅबमध्ये तज्ज्ञांची कमतरता असल्याने गुन्ह्यांमधील पुराव्यांचे विश्लेषणच होत नाही. चालू वर्षात जूनपर्यंत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील ११८५ आणि महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील ९२५ डीएनए सॅम्पल तपासण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञच उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे हे २११० नमुने पडून आहेत.

मंजुरी ‘कायमस्वरूपी’, आश्वासन ‘कंत्राटी’चे - फाॅरेन्सिक लॅबमधील पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी गृहविभागाने २८ सप्टेंबर रोजीच मान्यता दिली आहे. असे असतानाही आता गृहमंत्र्यांनी अधिवेशनात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचे आश्वासन दिले. यावरून विरोधकांसह फॉरेन्सिक सायन्सच्या बेरोजगारांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे. विविध गुन्ह्यांमधील पुराव्यांचे विश्लेषण करणे हे काम गोपनीय पद्धतीचे असतानाही या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे धोक्याचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम