शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren Death: ‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:12 IST

मनसुख हिरेन हत्या प्रकरण, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे.

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेचा ताबा एटीएस लवकरच घेणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेल्या वाझेची २५ तारखेला कोठडी संपत असल्याने त्याचा ताबा मिळावा यासाठी एटीएसने एनआयए कोर्टात मागणी केली आहे. ठाणे दंडाधिकाऱ्यांकडून त्याचे ट्रान्स्फर वाॅरंटही घेतले आहे. वाझेच्या ताब्यानंतर हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांनी सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. मनसुख यांच्या हत्या प्रकरणात वाझे आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांनी कार्यालय, परिसर तसेच अनेक मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. वाझेच्या चौकशीतून यामागील हेतू स्पष्ट होईल, असे सिंह यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी संशयितांकडे चौकशी सुरू असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. वाझेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे महत्त्वाचे पुरावेही एटीएसच्या हाती लागले आहेत.

दमण येथून जप्त केलेल्या कारमध्ये मिळाल्या २ बॅगाठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक व्होल्वो कार सोमवारी दमण येथून जप्त केली. या कारमधून दोन बॅगा पोलिसांनी हस्तगत केल्या. ही कार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे वापरत असल्याचा संशय असून तिची मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. या कारची मालकी किंवा सध्या ती कोण वापरत होते, याची माहिती ‘एटीएस’कडून देण्यात न आल्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील अँटिलिया इमारतीजवळ मिळालेल्या स्फोटके असलेल्या कारप्रकरणी अटक केलेले मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या वापरातील पाच वेगवेगळ्या कार आतापर्यंत जप्त केल्या आहेत. या प्रत्येक कारचा नेमका वापर कशासाठी झाला, त्याचा मनसुख हत्येशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास एनआयएकडून सध्या सुरू आहे. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist Squadएटीएस