शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Mansukh Hiren Case: तपास तात्काळ थांबवा, NIAकडे सोपवा; ठाणे सत्र न्यायालयाचे ATSला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:36 IST

Mansukh Hiren Case: स्फोटकांनी भरलेल्या कारसोबतच आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील एनआयए करणार

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. चारच दिवसांपूर्वी गृह मंत्रालयानं व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे सोपवला. या प्रकरणाबद्दल एनआयएनं न्यायालयात काल धक्कादायक माहिती दिली होती. गृह मंत्रालयाची सूचना मिळून ३ दिवस उलटूनही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं तपास हस्तांतरित केला नसल्याची माहिती एनआयएनं न्यायालयाला दिली होती. यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयानं एटीएसला महत्त्वाचा आदेश दिला आहे.आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता मनसुख हिरेन हत्येचा तपास तात्काळा थांबवा आणि तो एनआयएला सोपवा, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला दिले आहेत. त्यामुळे आता एटीएसला लगेचच मनसुख हिरेन प्रकरणातील पुरावे, कागदपत्रं एनआयएकडे हस्तांतरित करावी लागतील. विशेष म्हणजे कालच एटीएसनं पत्रकार परिषद घेत मनसुख हिरेन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात एटीएसने पाळत ठेवून नरेश रमणीकलाल गोर आणि विनायक बाळासाहेब शिंदे यांना अटक केली असून विनायक शिंदेने मनसुख यांची हत्या घडवून आणली असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजित सिंग यांनी माहिती दिली. एटीएस मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहोचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली होती.‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी८ मार्च रोजी सचिन वाझे यांचे एटीएसने जबाब नोंद केले असता त्यांनी मी मनसुख यांना ओळखत नसून मला स्कॉर्पिओबद्दल माहिती नाही असे सांगितले. मात्र, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांच्यावरवर संशयाचे बोट दाखवल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. याप्रकरणी अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून काही साक्षीदार कोर्टात सीआरपीसी १६४ अन्वये साक्ष देण्यास तयार आहे. मुख्य आरोपी सचिन वाझे यांचा ट्रान्सीट रिमांडला कोर्टाकडून परवानगी मिळाली असून त्यांची NIA कोठडी २५ मार्चला संपणार आहे. त्यामुळे वाझे यांच्या कोठडीची २५ मार्चला कोर्टात एटीएस अपील दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली.   

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist Squadएटीएस