शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren: ११ मिनिटे संभाषण, कॉलमागे सचिन वाझे कनेक्शन; गायमुख परिसरात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:16 IST

एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले.

मुंबई : मनसुख हिरन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले.  गायमुख येथे बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेला. यात, वाटेत कोणी अडवू नये म्हणून ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षकही वाहनात उपस्थित होते. या अधिकाऱ्यालाही यात अटक होण्याची शक्यता आहे.

काम झाल्यावर वाझे रात्री साडेदहाच्या सुमारास ते ठाण्याहून फ्री वेवरून मुंबईत पोहोचले. फ्री वे उतरल्यावर सर्वांत जवळचे पोलीस ठाणे हे डोंगरी असल्याने त्यांनी बारवर कारवाई दाखविण्यासाठी हे पोलीस ठाणे निवडले होते. येथील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सिमकार्डही केले नष्टयातील अन्य साथीदारांनी दोन वेगवगेळ्या ठिकाणी सिमकार्डही नष्ट केले. त्यामुळे मनसुख यांचे दोन लोकेशन दाखविले होते.

डान्सबार मालकाकडे चौकशी३ मार्च रोजी एक डान्स बार मालक आपल्या मर्सिडीजमधून पोलीस आयुक्त कार्यालयात आला होता. जवळपास चार ते पाच तास तो सीआययूच्या कार्यालयात उपस्थित होता. तेव्हा वाझे, विनायक शिंदेसह गुन्हे शाखेतील एक प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही तेथे हजर होता. त्यामुळे ही मंडळी येथे काय करत होती, तो डान्स बारमालक तेथे का आला? यासाठी त्यालाही गुरुवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती समजते आहे.

११ मिनिटे संभाषण... कॉलमागे वाझे कनेक्शन४ मार्चच्या रात्री मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्या व्यक्तीसोबत मनसुख यांचे ११ मिनिटे संभाषण झाल्याचे समोर आले. तो व्यक्ती मनसुख यांच्या ओळखीचा असल्याशिवाय ते त्याच्याशी एवढा वेळ बोलणे शक्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा