डोंबिवली - आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे समुपदेशन करत त्याला आत्महत्येपासून मानपाडा पोलिसांनी परावृत्त केले आहे.शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्तालयाचे व्टिटर खात्यावर एका नागरिकाने व्टिट करत माहिती दिली की, डोंबिवली येथे राहणाऱ्या त्याच्या मित्राने फेसबुक खात्यावर तासाभरापूर्वी आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली आहे. त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे. या फेसबुक खात्यावर असलेल्या तरुणाचे तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, हा तरुण डोंबिवली पूर्वेतील दावडी गाव परिसरात रहात असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली.या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष वलवे, पोलिस नाईक दिपक जाधव, विशाल चौधरी आणि शामकांत रायते यांनी तत्काळ सदर पत्यावर जावून त्या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या युवकाशी बोलून त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले. याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. सध्या या तरुणाला त्यांच्या कुटुंबियांच्या सूपुर्द करण्यात आले आहे.
फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्येच्या प्रयत्नात होता तरुण; मानपाडा पोलिसांकडून मनपरिवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:47 IST
मानपाडा पोलिसांनी केले आत्महत्येपासून परावृत्त
फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्येच्या प्रयत्नात होता तरुण; मानपाडा पोलिसांकडून मनपरिवर्तन
ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे समुपदेशन करत त्याला आत्महत्येपासून मानपाडा पोलिसांनी परावृत्त केले आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वेतील दावडी गाव परिसरात रहात असल्याचे निदर्शनास आले.