शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

बापरे! एक्स गर्लफ्रेंडच्या घरात कंडोम सापडलं; संतापलेल्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 12:15 PM

३३ वर्षीय क्रिस ब्लेकमोर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरात जबरदस्तीनं घुसला होता.

एका व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर चाकूने हल्ला करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्यक्ती त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तेव्हा तेथील बाथरुममध्ये गेला असता त्याला जे काही दिसले त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. बाथरुम बाहेर येऊन त्याने महिलेसोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने तिच्यावर सलग ३१ वार केले. त्यात पीडित युवती गंभीर जखमी झाली.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय क्रिस ब्लेकमोर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरात जबरदस्तीनं घुसला होता. त्यावेळी तो बाथरुममध्ये गेला असता त्याला तेथील डस्टबिनमध्ये कंडोमचं रॅपर दिसलं. त्यानंतर क्रिस प्रचंड भडकला होता. त्याने महिलेशी वाद घालत तिच्यावर चाकूने हल्ला केला. एकामागोमाग एक असे ३१ वार त्याने महिलेवर करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यातून महिलेचा जीव थोडक्यात बचावला. हल्ल्याच्यावेळी घरात ७ वर्षाचा मुलगाही उपस्थित होता. त्याच्यासमोरच ब्लेकमोरनं महिलेवर सपासप वार केले.

कंडोम रॅपर पाहून राग अनावर

क्रिस ब्लेकमोर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वाईट वर्तवणूक करायचा. मारहाण करणे, जबरदस्तीने पैसे घेणे असा छळ रोजचा झाला होता. त्यामुळे महिलेने वैतागून त्याच्याशी ब्रेकअप केला. त्यानंतर महिला दुसऱ्यासोबत राहू लागली. परंतु एकेदिवशी ब्लेकमोर बळजबरीनं महिलेच्या घरात घुसला आणि तिच्याशी वाद घालू लागला. तेव्हा घरच्या बाथरुममध्ये कंडोमचं रॅपर पाहून तो भडकला.

त्यानंतर महिलेवर त्याने चाकू हल्ला केला. कसंतरी ब्लेकमोरच्या तावडीतून महिलेने पळ काढत पोलिसांना कॉल केला. त्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला. महिला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती. या महिलेची हत्या करण्याचा ब्लेकमोरचा डाव होता असं पोलीस म्हणाले. सध्या ब्लेकमोरला पोलिसांनी अटक केली असून ब्रिटन येथे कोर्टात हजर केले. तेव्हा महिलेला जीवे मारायचं नव्हतं असे त्याने कोर्टात दावा केला. कोर्टाने ब्लेकमोरला जेलमध्ये पाठवलं असून २५ फेब्रुवारीला त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.