शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

खुल्या जागेत फेकण्यात आले शस्त्रक्रीयेनंतरचे माणसांचे अवयव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 21:18 IST

हे अवयव कुठल्यातरी इस्पितळाने अथवा लॅबोरेट्रीने येथे फेकले असावे असा प्रथम अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी हे कृत्य कोणी केले आहे. याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. जर हे अवयव योग्यरित्या नष्ट न करता कोणी जाणून - बुजून खुल्या जागेत फेकले आहेत.

वास्को - शस्त्रक्रियेनंतरचे अवयव प्लास्टिक डब्यात घालून आज दुपारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील खुल्या जागेत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुल्या जागेत १५ ते २० डब्यात अवयव घालून फेकण्यात आल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन या हलगर्जीपणाचा हा प्रकार कोणी केला आहे याबाबत त्यांच्याकडून चौकशी चालू करण्यात आली आहे.शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीच्या समोरील खुल्या जागेत डब्यात बंद करून माणसाचे विविध अवयव फेकण्यात आल्याची घटना समोर आली. कचरा उचलणारे काही लोक या भागात फिरत असताना त्यांना येथे प्लास्टिक डबे इतरत्र पडल्याचे दिसून येताच त्यांपैकी एक त्यांनी नेण्यासाठी उचलला असता यात अवयव असल्याचे त्यांना लक्षात आले. या प्रकाराबाबत पोलिसांना कळवण्यात येताच मायणा - कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीणकुमार वस्त, वेर्णा पोलीस निरीक्षक निनाद देऊळकर यांनी इतर पोलिसांसहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारे खुल्या जागेत अवयव फेकण्यात आल्याचे जवळपास राहणाऱ्या नागरीकांना कळताच याबाबत त्यांच्यातही संतापाचे वातावरण पसरले. या प्रकरणाचा तपास करत असताना त्या डब्यावर रुग्णाचे नाव, इस्पितळाचा कोड नंबर, रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरचे नाव तसेच कुठल्या वर्षी हा अवयव काढण्यात आलेला आहे याबाबत माहीती नमूद असलेली चिठ्ठी असल्याचे दिसून आले. फेकण्यात आलेल्या ह्या अवयवापैंकी काही अवयव २०१४ साली शस्त्रक्रीया करून काढलेल्यापैंकी असल्याचे पोलीसांना तपासाच्या दरम्यान समजल्याचे सूत्रांनी कळविले. शस्त्रक्रीया करून काढलेले हे अवयवांची योग्यरित्या विल्हेवाट न लावता अशा प्रकारे फेकण्यात आल्याने हा प्रकार कोणी केला आहे. याबाबत चौकशी चालू करण्यात आल्याची माहिती निरीक्षक वस्त यांनी दिली. अवयव कधी फेकण्यात आले आहे. याबाबत समजू शकले नसले. तरी शुक्रवारी उशिरा रात्री कुठल्यातरी वाहनाने हे अवयव येथे आणल्यानंतर फेकण्यात आले असावे असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.हे अवयव कुठल्यातरी इस्पितळाने अथवा लॅबोरेट्रीने येथे फेकले असावे असा प्रथम अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी हे कृत्य कोणी केले आहे. याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. जर हे अवयव योग्यरित्या नष्ट न करता कोणी जाणून - बुजून खुल्या जागेत फेकले आहेत. तर त्याच्यावर असलेली माहिती त्यांच्याकडून काढली असती. मात्र, तसे करण्यात आले नसल्याने कोणाचे नाव बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला असावा असा संशयही तपास करणाऱ्या यंत्रणाकडून सध्या व्यक्त केला जात आहे. अवयवांची योग्यरित्या विल्हेवाट न लावता ते येथे अशा प्रकारे खुल्या जागेत कोणी फेकले याचा सध्या तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक वस्त यांनी सांगून हे कृत्य केलेल्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार अशी माहीती त्यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा