शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच घेतला वडिलांचा जीव अन् नंतर उर बडवून रडू लागला लेक! पोलिसांनी कसा लावला हत्येचा छडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:50 IST

आपल्याच पित्याला संपवून ही दोन्ही मुलं विलाप करण्याचं नाटक करत होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं.

हरियाणा जिल्ह्याच्या रेवाडी गावरीत कलाका नाल्याजवळ ३१ मेला एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला तिथून ते गावाच्या रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसले होते. संगवाडी गावात राहणाऱ्या लाल सिंह यांचं हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृत लाल सिंह यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

आता पोलिसांनी या प्रकरणात एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. लाल सिंह यांची हत्या त्यांच्याच दोन्ही मुलांनी केल्याचे समोर आले आहे. आपल्याच पित्याला संपवून ही दोन्ही मुलं विलाप करण्याचं नाटक करत होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून, आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे. लाल सिंह यांचा मुलगा मोहित याला पवन खुशवाह नामक मित्राची देखील यात साथ मिळाली होती.

मित्राच्या मदतीने वडिलांना संपवलं!

पवन खुशवाह हा मूळचा मथुरा येथील रहिवासी आहे आणि सध्या बाणीपूर चौकाजवळ भाड्याने राहतो. दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले आणि एक दिवसाची कोठडी सुनावली. तपासात समोर आले की, दोन्ही मुलांनी त्यांचा तिसरा साथीदार पवन खुशवाह याच्यासोबत मिळून आपल्याच वडिलांची हत्या केली होती. लाल सिंह यांच्या डोक्यात लोखंडी मुसळीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह दुचाकीवर ठेवण्यात आला. त्यानंतर तो कालका नाल्याजवळ फेकून देण्यात आला.

का केली हत्या?

या प्रकरणातील तिसरा आरोपी लाल सिंहचा मुलगा रोहित हा शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात आधीच न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस त्याची प्रोडक्शन वॉरंटवर चौकशी करतील. पोलीस चौकशीदरम्यान मोहितने सांगितले की, त्याने त्याचा भाऊ रोहित आणि त्याचा मित्र पवन कुशवाहा यांच्यासोबत मिळून कुटुंबाच्या जमिनीच्या वादातून त्याच्या वडिलांची हत्या केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश