शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपातून २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; २ दशकांत अख्खं कुटुंब संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 12:16 IST

बलात्काराच्या आरोपाखाली दोषी आढळलेल्या तरुणाची हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता; ४३ वर्षांचा विष्णू तुरुंगातून बाहेर येणार

आग्रा: बलात्कार प्रकरणात गेल्या २० वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीची अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. विष्णू तिवारी असं निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विष्णू २३ वर्षांचा असताना न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो बलात्काराच्या आरोपात दोषी आढळला होता. आता २० वर्षांनंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण या कालावधीत त्यानं त्याचे आई-वडील आणि दोन मोठे भाऊ गमावले.भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघडविष्णूची लवकरच तुरुंगात मुक्तता केली जाईल. आम्ही यासाठी आदेशाची वाट पाहत आहोत, अशी माहिती आग्र्याच्या तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही. के. सिंह यांनी सांगितलं. विष्णूनं कोणताही अपराध केला नसताना त्याला २ दशकं तुरुंगात काढावी लागली. ही बाब दुर्देवी असल्याचं सिंह पुढे म्हणाले.आयपीसी आणि एससी/एसटीच्या अंतर्गत गुन्हा दाखलविष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहे. वर्ष २००० मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णूवर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि दोन भावांसोबत राहायचा. कुटुंबाला मदत करण्यासाठी तो नोकरी करत होता.महिला न्यायाधीशांना 'बर्थ डे'च्या शुभेच्छा दिल्या, आरोपी वकिलास अटकवडील, भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकलाट्रायल कोर्टानं विष्णूला दोषी ठरवलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००३ मध्ये त्याची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. २००५ मध्ये विष्णूनं उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्याला आव्हान देता आलं नाही. सहा वर्षांपूर्वी विष्णूच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. दोन भावांच्या अंत्यविधींनादेखील तो गैरहजर होता.

टॅग्स :jailतुरुंग