शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मामीला घेऊन पळून गेला भाचा; नाराज मामाने 3 मुलांना दिलं विष अन् उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:29 IST

एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते.

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. त्याने आपल्या मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केलं. यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. तर मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धर्म चंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. याच दरम्यान, धर्म चंद याच्या पत्नीचे तिच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.

ही बाब धर्म चंद यांना समजताच त्याला मोठा धक्काच बसला. तो काळजीत पडला. काही दिवस एकटा आणि गप्प राहिला. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी रात्री धर्मचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतलं. त्यांना बिस्किटं खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटं खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. धर्म चंद याने बिस्किटांमध्ये विष मिसळले होतं.

स्वतः विष प्राशन केलं होतं. त्याला आपल्या मुलांची हत्या करून स्वतःचं जीवन संपवायचे होते. चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धर्म चंदचा मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी