शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट बँक उघडली, गावकऱ्यांना फसवले अन् ६० लाख रुपये घेऊन पळ काढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:09 IST

बनावट बँक स्थापन करून लोकांची फसवणूक करण्याचे हे नवीन प्रकरण जांजगीरच्या नवगढ पोलीस स्टेशन भागातील आहे.

सध्या फसवणुकीचे प्रकार दिसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की, ते निष्पाप लोकांना सहज लक्ष्य करतात. अशातच आता छत्तीसगडच्या जांजगीरमधून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका व्यक्तीने स्वतः बनावट बँक तयार केली. यानंतर लोकांनी त्या बँकेत पैसे जमा केले. ज्यावेळी या बनावट बँकेत ५० ते ६० लाख रुपये जमा झाले, त्यावेळी या व्यक्तीने सर्वांचे पैसे घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बनावट बँक स्थापन करून लोकांची फसवणूक करण्याचे हे नवीन प्रकरण जांजगीरच्या नवगढ पोलीस स्टेशन भागातील आहे. याठिकाणी कमलेश देवगण नावाच्या फिर्यादीने तक्रार दाखल करताना सांगितले होते की, मुख्तार अली नावाचा एक व्यक्ती आणि त्याचा मुलगा आमोदा गावात किराणा दुकान चालवायचे. यासोबतच हे दोघेही ऑनलाइन व्यवहार करायचे. बराच वेळ दुकान चालवल्यानंतर दोघांनी स्वतःची बँक काढली.

मुख्तार अली आणि त्याच्या मुलाने एरिऑल्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अमोदा, अशा नावाने बँक स्थापन केली. या बँकेत पैसे जमा केल्यास ग्राहकांना दरमहा एक किंवा दोन टक्के व्याज दिले जाईल, असे त्यांनी लोकांना सांगितले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बँकेत पैसे जमा करायला सुरुवात केली. ते हप्त्याने लोकांचे पैसे बँकेत जमा करत होते. यानंतर त्यांच्या बँकेत चांगली रक्कम जमा होऊ लागली.

तक्रारदार कमलेश देवगण यांनी सांगितले की, त्यांनी स्वत: मुख्तार आणि त्याच्या मुलाच्या बँकेत २४ हप्त्यांमध्ये तीन वर्षांत २३ लाख रुपये जमा केले. कमलेश देवगण यांच्याव्यतिरिक्त गावातील इतर लोकांनीही एरिऑल्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अमोदा, या बँकेत पैसे जमा केले होते. गावातील २० ते २५ लोकांनी या बँकेत जवळपास ५० ते ६० लाख रुपये जमा केले होते. हे सर्व पैसे घेऊन मुख्तार अली आणि त्याचा मुलगा पळून गेला. परंतु तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला रायपूर येथून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड