शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला खूश करण्याचा नाद भोवला, पठ्ठ्यानं १०० तोळ्याचा सुवर्ण हार बनवला;पोलिसांनी बोलावलं अन् डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:31 IST

या व्हिडीओत हा व्यक्ती पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानमित्त १०० तोळ्याचा हार देताना दिसत आहे.

ठळक मुद्देगुडघ्यापर्यंत लांब असलेल्या सोन्याच्या हारानं सगळेच अचंबित झाले.हा सोन्याचा हार तब्बल १०० तोळ्याचा असल्याचा दावा युवकाने केला.सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावलं

ठाणे – गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढत आहे. आज १ तोळा खरेदी करतानाही सर्वसामान्यांची पंचाईत होते. अशातच कोणी १०० तोळं सोन्याचा हार खरेदी केला आहे अशी बातमी तुम्ही ऐकली तर आश्चर्यचकीत व्हाल ना..भिवंडीतील कोनगाव येथे बाळा कोळी नावाच्या युवकानं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला १०० तोळे सोन्याचा हार दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडीओत हा व्यक्ती पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानमित्त १०० तोळ्याचा हार देताना दिसत आहे. गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या सोन्याच्या हारानं सगळेच अचंबित झाले. हा सोन्याचा हार तब्बल १०० तोळ्याचा असल्याचा दावा युवकाने केला. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावलं त्यानंतर या युवकाने जी माहिती दिली ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. हा हार सोन्याचा नाही तर नकली आहे असं युवकाने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी एका सराफा व्यवसायिकाकडून हा हार तपासून घेतला तेव्हा तो खोटा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या या व्हिडीओनं सगळ्यांचे डोळे अवाक् झाले. कोनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की, ज्वेलरी संदर्भात कोणतीही माहिती लोकांनी सोशल मीडियावर टाकू नये यामुळे चोरी होण्याची शक्यता असते. बाळा कोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस त्याच्या घरी गेली आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं. इतकी महाग वस्तू कुठून आणि कशी घेतली अशी विचारणा पोलिसांनी केली. हा हार तात्काळ बँकेत ठेवण्याची सूचना पोलिसांनी दिली. संबंधित व्यक्तीने तो हार खोटा असल्याची कबुली दिली असं पोलीस म्हणाले.

३८ हजार रुपयात खरेदी केला हार

सोन्यासारख्या दिसणाऱ्या या १०० तोळ्याच्या हाराची किंमत ३८ हजार रुपये आहे. बाळा कोळी यांनी कल्याणमधील एका ज्वेलरीच्या दुकानात तो खरेदी केला. पत्नीला खूश करण्यासाठी त्याने हा हार विकत घेतला. बाळाने सांगितली बाब खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी या ज्वेलरी दुकानाशी संपर्क साधला तेव्हा तो हार नकली असल्याची पुष्टी त्यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस