शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 16:30 IST

जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. 

ठळक मुद्देसंशयित आरोपी समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर २०१७ मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. समीर कुलकर्णी यांच्या पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील निवास्थानी हा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे.

पुणे - २००८ साली झालेल्या मालेगांव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एक शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आला आहे. समीर कुलकर्णी यांच्या पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील निवास्थानी हा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. 

त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी आणि सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या समीर कुलकर्णींनी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांची ऑक्टोबर २०१७ मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने ९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ५० हजारांचा जातमुचलक्यावर त्यांची सुटका करत मोठा दिलासा दिला होता.मालेगावात सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या दुचाकी बॉम्बस्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच शंभरपेक्षा अधिक जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह १२ जणांना संशयित म्हणून अटक केली होती. भोपाळ येथे राहणारे समीर कुलकर्णी हे छपाई कामगार होते. मालेगाव बॉम्बस्फोटासाठी त्याने केमिकलचा पुरवठा केल्याचे तसेच बॉम्बस्फोटासाठी नाशिक आणि इंदूर येथे झालेल्या बैठकीत त्याने सहभाग घेतल्याचे त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहे.   

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटPuneपुणेPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस