शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना टळली, राजुर घाटात ट्रक उलटला; कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:36 IST

Accident Case : बुलडाणा-मोताळा रोडवरील राजुर घाटातील घटना

बुलडाणा : मोताळ्याकडे जाणारा ट्रक राजुर घाटातील एका वळणावर उलटला. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान घडली. यामध्ये ट्रकचा चालक केबिनमध्येच अडकला होता. मात्र, नागरिकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर चालकास ट्रकमधून काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

बुलडाण्याहून मोताळ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमपी-०९-एचजी-१५५५) शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुुर घाटातील एका वळणावर उलटला. विशेष म्हणजे, ट्रकची गती अधिक असल्याने ट्रक चालक गुरमितसिंह याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात ट्रकमधील मुकेश बाबर हे किरकोळ जखमी झाले असून, ट्रक चालक गुरमितसिंह यांना घटनेच्या १५ मिनिटांनंतर ट्रकच्या केबिनमधून काढण्यात नागरिकांना यश आले. यावेळी घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

कार थोडक्यात बचावलीबुलडाण्याहून मोताळ्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने, घाटातील एका वळणार उलटत असताना, मोताळ्याहून बुलडाण्याकडे येणाऱ्या कार क्रमांक (एमएच-२८-एझेड-७२८०) ही कार थोडक्यात बचावली. ट्रक उलटत आहे, हे लक्षात येताच, कार चालकाने वाहनाची गती वाढवून ट्रकच्या बाजूला जात अपघात टाळला. ट्रक जर कारवर आदळला असता, तर कारमधील तीन ते चार जणांच्या जीवावर बेतली असती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, या सर्व घटनेदरम्यान कारला कट लागल्याने कारचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाcarकारPoliceपोलिस