शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून गोवंडीमध्ये माय-लेकावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:56 IST

अब्दुल उर्फ बब्बू चौधरी असे या हल्लेखोर आरोपीचे नाव असून गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करुन देवनार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

मुंबई - किरकोळ वादातून 40 वर्षीय दारुड्याने एका महिलेसह तिच्या लहान मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी गोवंडीमध्ये घडली. अब्दुल उर्फ बब्बू चौधरी असे या हल्लेखोर आरोपीचे नाव असून गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करुन देवनार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गौतमनगर परिसरात कुटूंबासोबत राहत असून तिच्या पतीचा हॉटेल व्यवसाय आहे. परिसरात राहणारा आणि हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असलेल्या बब्बूला परिचय होता. शनिवारी दुपारी महिला कुटूंबियांसोबत घरामध्ये जेवण करत असताना दारुच्या नशेमध्ये बब्बूने त्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. घरातून कोणीतरी आपल्या अंगावर थुकल्याचे सांगत बब्बू शिविगाळ करत होता. याचा जाब विचारल्याने तो या विवाहितेला मारहाण करण्यासाठी धावला. मात्र, स्थानिक जमा होत असल्याचे बघून तो पसार झाला होता. रविवारी दुपारी दिडच्या सुमारास महिला मुलासोबत घराबाहेर एकटीच असल्याचे हेरुन बब्बूने दोघांवरही हल्ला करुन पळ काढला. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या देवनार पोलिसांनी दोन्ही जखमींना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या जखमी महिलेचा जबाब नोंदवून तिच्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक