शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस सर्वोत्कृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 19:18 IST

लखनौतील स्पर्धेत ३० राज्यातील संघ सहभाग; महाराष्ट्राला ५ सुवर्णासह १२ पदके

ठळक मुद्दे या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कास्य अशी एकुण १३ पदके पटकाविली. देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १२५० स्पर्धक सहभागी होते.

 

मुंबई - अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस दलाने सर्वच गटामध्ये वर्चस्व मिळवित सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ६२ व्या राष्ट्रीय कर्तव्य मेळावा १६ ते २० जुलै या कालावधीत झाला. त्यामध्ये देशभरातील ३० राज्य पोलीस संघाचे १२५० स्पर्धक सहभागी होते.व्यावसायिक आणि गुन्हे तपास शैलीचा कस पाहणाऱ्या या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कास्य अशी एकुण १३ पदके पटकाविली. कर्तव्य मेळाव्यात सर्वसाधारण विजेता ठरण्याचा मान महाराष्ट्र पोलीस दलाला पहिल्यादात मिळाला आहे, असे या संघाचे मार्गदर्शक व राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी पुण्यात सराव शिबीर झाले होते. त्यानंतर संघ व्यवस्थापक अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली ४० स्पर्धक रवाना झाले होते. त्याठिकाणी सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन (विज्ञान शास्त्राची तपासात मदत),घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक, पोलीस फोटोग्राफी आदी प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये तपासात विज्ञान शास्त्राची मदत- अमोल पवार (सहाय्यक निरीक्षक, लातूर), नितीन गिते (निरीक्षक मुंबई शहर), राहुल खटावकर (सहाय्यक निरीक्षक, औरंगाबाद शहर) यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकाविले. तर फॉरेन्सिक सायन्स-नितीन गिते (मुंबई), इकबाल शेख (हवालदार सोलापूर ग्रामीण), राखी खवले (हवालदार, सीआयडी), अतुल जाधव (हवालदार, सातारा) हा संघ विजेता ठरला. संगणक जागृती स्पर्धेत सहाय्यक फौजदार विजय कुंभार (वायरलेस, पुणे) आणि कॉन्स्टेबल हणुमंत भोसले (सातारा) व पोलीस व्हिडीओ ग्राफीमध्ये समीर बेंदगुडे (नाईक,एसआरपीएफ) यांनी रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्र पोलीस संघाला महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक व प्रविण साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र