शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

भाजपाच्या आमदाराने केला गोळीबार; देवेंद्र फडणवीसांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:47 IST

सदर घडलेल्या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

'ते शांत बसलेले, गणपत गायकवाड उठले, नेम धरला...'; नेमकं काय घडलं?, पोलिसांनी सांगितलं!

सदर घडलेल्या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात, असं अजित पवार म्हणाले. याचदरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

होय, मी गोळीबार केला-

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच गोळी झाडल्याची ही घटना घडली आहे. पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी कबूल केलं. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे  माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले. 

गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप-

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस