शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी एटीएसने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 22:04 IST

नागपूर येथून केली आरोपीला अटक

ठळक मुद्देनागपूर युनिटने झिंगाबाई टाकळी येथून सैय्यद असीम अली (२९) याला अटक केली आहे.ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्याचा ताबा लवकरच उत्तर प्रदेश पोलीस घेणार आहेत.  

मुंबई - उत्तर प्रदेशातील हिंदू संघटनेचा कार्यकर्ता कमलेश तिवारी याच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना सुरतहून अटक केली आहे. या संशयितांनी आपला गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हे दहशतवादी कृत्य असल्याचे पोलिसांनी खंडन केले. यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने झिंगाबाई टाकळी येथून सैय्यद असीम अली (२९) याला अटक केली आहे. सैय्यद हा हार्डवेअर दुकानाचा मालक आहे.  पोलिसांनी बिजनौरमधून मौलाना अनवर उल हक याला अटक केली होती. याशिवाय मौलाना मुफ्ती नईम काजमीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कमलेश तिवारीला ठार करणाऱ्यास दीड कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे २०१५ साली जाहीर केले होते. कमलेश तिवारीने प्रक्षोभक व आक्षेपार्ह भाषण केले होते. लखनौमध्ये कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. अटक केलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात सैय्यद असल्याने त्याचा मागावर एटीएसचे पथक होते. त्याला नागपूर येथून अटक करून चौकशी केली असता त्याचा या हत्याकांडात महत्वपूर्ण सहभाग असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे. सैय्यदला नागपूर येथील कोर्टात हजर केले असता त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्याचा ताबा लवकरच उत्तर प्रदेश पोलीस घेणार आहेत.  कशी केली हत्या?तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पैंगबरांवरील विधानामुळे ते चर्चेत होते. लखनौ खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पार्टी कार्यालयात चहा पिण्याच्या बहाण्याने हल्लेखोर आले होते. मिठाईच्या डब्यात चाकू आणि देशी कट्टा घेऊन आले होते. येथे हल्लेखोराने तिवारी यांच्यावर हल्ला करत त्यांची गळा चिरून हत्या केली.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसnagpurनागपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनArrestअटक