शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Video - लेक झाला हैवान! जन्मदात्या आईलाच केली बेदम मारहाण, घराबाहेर काढले, केस ओढले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 13:51 IST

एका मुलाने आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. लेकाने आईचे केस ओढले. तिला ओढत रस्त्यावर आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नौतनवा परिसरात एका मुलाने आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. लेकाने आईचे केस ओढले. तिला ओढत रस्त्यावर आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलाच्या भयंकर कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमला देवी या महिलेने आपले शेत दुसऱ्या व्यक्तीला शेती करायला दिले आहे. पीक तयार झाल्यावर ती व्यक्ती आपल्य़ा हिस्साचे पैसे देण्यासाठी घरी आली, मात्र त्य़ावेळी कमला देवी घरात हजर नव्हत्या. त्यामुळे त्या व्यक्तीने कमला देवीच्या मुलाला पैसे दिले आणि आई आल्यावर तिला हे पैसे दे असं सांगितलं. जेव्हा आईला पैसे मुलाकडे दिले आहेत हे समजलं तेव्हा त्यांनी मुलाकडे पैसे मागितले. पण पैसे मागताच मुलगा चिडला आणि त्याने रागाच्या भरात त्याने आईला मारायला सुरुवात केली.

मुलगा आईला बेदम मारत असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा आईचे केस ओढतो आणि तिला घरातून बाहेर काढतो, त्यानंतर तिला बेदम मारहाण करतो. याच दरम्यान काही लोक मध्यस्थी करण्यासाठीही येतात, मात्र आरोपी त्यांच्याशीही भांडण करू लागतो. आजूबाजूच्या लोकांनी महिलेला कसेबसे वाचवले. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सीओ नौतनवा अनुज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली. मुलानेच आईला बेदम मारहाण केली. कमला देवी यांचा मुलगा रितेश वर्मा विरुद्ध कलम 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी