शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नियमांंचं उल्लंघन करणाऱ्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 13:03 IST

यावेळी कोरोना साथीच्या अटकाव करण्यासाठीच्या नियमांचेही दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे दाती महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकाही व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात दाती महाराज शनिदेव मंदिरात काही भाविकांसह प्रार्थना करताना दिसले होते.दाती महाराजांवर भा. दं. वि. कलम १८८/३४ डीडीएमए अधिनियम ५४ बी आणि साथीच्या रोग अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी दाती महाराज यांना बुधवारी दिल्लीपोलिसांनीअटक केली. मात्र नंतर त्यांना जामीन मंजूर झाला. नुकतेच दाती महाराजांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. काही व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात दाती महाराज शनिदेव मंदिरात काही भाविकांसह प्रार्थना करताना दिसले होते. यावेळी एकतर सामाजिक अंतर पाळले गेले नाही. त्याचवेळी काही लोकांनी मास्क घातले नव्हते.यावेळी कोरोना साथीच्या अटकाव करण्यासाठीच्या नियमांचेही दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे दाती महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ज्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे ते जामीनपात्र कलम आहेत, म्हणून पोलिसांनी दाती महाराजांना अटक केली आणि जामिनावर सोडले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना जे काही पुरावे सापडले ते दाती महाराजांच्या विरोधात होते. सुरुवातीच्या तपासणीदरम्यान हेही स्पष्ट झाले की केवळ दाती महाराजांच्या सांगण्यावरून मंदिरात जमाव जमला होता. दाती महाराजांच्या मंदिरासमोर पोलिसांना एक पोस्टर सापडले होते, ज्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, 22 मे रोजी शनी जयंती महोत्सवानिमित्त शनी मंदिरात जमा व्हा. म्हणजेच लॉकडाऊन दरम्यान हा कार्यक्रम दाती महाराजांनी आयोजित केला होता, ज्यांची परवानगीही घेण्यात आलेली नव्हती.

नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

 

प्रेयसीनं रात्री घरी बोलावणं ठरलं कर्दनकाळ; घरी जाताच झाली हत्या!

कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाऊन जारी केला आहे. लॉकडाऊनदरम्यान लोकांना सामाजिक अंतरांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि लोकांच्या जमावावर देखील बंदी घातली आहे. या दरम्यान हा धार्मिक कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. दाती महाराजांवर भा. दं. वि. कलम १८८/३४ डीडीएमए अधिनियम ५४ बी आणि साथीच्या रोग अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीएस मैदान गढी येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Arrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिस