शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगा प्रिंटेड शूज विकल्याबद्दल Amazon सेलरवर FIR; अ‍ॅक्शन होणारच! गृहमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:02 IST

गृहमंत्री मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अ‍ॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे अ‍ॅमेझॉनच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने तिरंग्याचा गैरवापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर तिरंगा छापलेले शूज विकल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचे निर्देश दिले.

गृहमंत्री मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अ‍ॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सेलसोबतच राष्ट्रध्वज छपलेले शूज विक्रीचे फोटोही देण्यात आले आहेत. सोशल मीडिया यूजर्स याप्रकरणी कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती मिळताच मंगलवारी कंपनी विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. मिश्रा म्हणाले, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात डीजीपीना FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

असे कृत्य सहन केले जाणार नाही -  मिश्रा म्हणाले, अ‍ॅमेझॉन कंपनीबाबत जी माहिती समोर आली आहे, ती वेदनादायक असून मध्य प्रदेशात हे खपवून घेतले जाणार नाही. देशाचा अपमान होईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. पोलीस कारवाई केली जाईल, असे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही राज्यात ऑनलाइन ड्रग्सची डिलीव्हरी करण्याचा मुद्दाही गाजला होता.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी