शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! गळ्यात टायर बांधला अन्…; घरातून पळून जाणाऱ्या तरुण-तरुणीसोबत गैरवर्तन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:21 IST

Crime News : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक जण तरुणाला काठीने मारताना देखील दिसत आहेत.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली. एक तरुणी, तिच्यासोबत पळून जाणारा तरुण आणि यासाठी मदत करणारी मुलीची अल्पवयीन बहीण या तिघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघांच्याही गळ्यात टायर लटकवले आणि लोकांसमोर गाण्यावर नाचण्यास त्यांना भाग पाडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. धार जिल्ह्यातील गंधवानी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

14 वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. 19 वर्षीय मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि नातेवाईकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 254, 323, 506, 354, 363, 343 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार जिल्हा एसपी आदित्यसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे 19 वर्षीय मुलीसोबत पळून जाणाऱ्या तरुणावर यापूर्वी याच मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्या तरुणाला अटक देखील करण्यात आली.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक जण तरुणाला काठीने मारताना देखील दिसत आहेत. ही संपूर्ण घटना गंधवानी येथील कुंडी गावाची असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुला-मुलीच्या घरातून पळून जाण्याशी संबंधित असून यामध्ये लहान बहिणीने आपल्या मोठ्या बहिणीला मदत केली आहे. सोमवारी आरोपीविरोधात गांधवानी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काहींना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेश