शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशमध्ये वृद्धेच्या घरात घुसून घरफोडी करणारी दुकली उल्हासनगरात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 18:53 IST

House Breaking : चोरट्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देआनंद मंडल याला डोंबिवली येथील खोनी फाटा तर मुकेश खूबचंदानी याला शहरातील शिवाजी चौक परिसरातून जेरबंद करण्यात यश आले. त्यांनी चोरीची कबुली दिली असून काही प्रमाणात चोरीचे दागिने जप्त केले.

उल्हासनगर : मध्यप्रदेशमध्ये एका वृद्धेच्या घरात जबरीने घुसून घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. चोरट्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.मध्यप्रदेश इंदोर जिल्ह्यातील अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धेच्या घरात ९ डिसेंबर रोजी दुपारी साडे १२ वाजता आनंद मंडल व मुकेश खूबचंदानी यांनी जबरीने घुसून कपाटातून ५० हजाराचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरटे उल्हासनगरात आल्याच्या संशयावरून मध्यप्रदेश पोलिसांनी शहर गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस पथकाने घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण याद्वारे आनंद मंडल याला डोंबिवली येथील खोनी फाटा तर मुकेश खूबचंदानी याला शहरातील शिवाजी चौक परिसरातून जेरबंद करण्यात यश आले. त्यांनी चोरीची कबुली दिली असून काही प्रमाणात चोरीचे दागिने जप्त केले.मध्यप्रदेशच्या अट्टल घरफोडी चोरांना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका आठवड्यात जेरबंद केले. चोरट्याने चोरीची कबुली दिली असून त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश