Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दीपक धुर्वे (वय ३०) या तरुणावर आपल्या आई-वडील आणि लहान भावाची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. मानसिक तणाव आणि दीर्घकाळापासून येत असलेल्या अपयशामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या घटनेत राजू उर्फ हंसू धुर्वे (वय ५५ वडील), कमल्ती धुर्वे (वय ४० आई) आणि दिलीप धुर्वे (लहान भाऊ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, पाच वर्षीय भाचा प्रशांत पर्टे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय घरात पाळलेली मांजरही मृत अवस्थेत आढळली आहे.
घटना उघडकीस कशी आली
गुरुवारी दुपारपर्यंत घराचे दार उघडे असूनही आतून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी घरात प्रवेश केला. आत प्रवेश करताच रक्ताने माखलेली जमीन, भिंती आणि मृतदेह पाहून सर्वजण हादरून गेले. आरोपी दीपक धुर्वे घटनास्थळी शांतपणे बसलेला आढळला.
मानसिक तणावाचा पार्श्वभूमी
ग्रामस्थ आणि नातेवाइकांच्या माहितीनुसार दीपक हा अभ्यासात हुशार होता आणि 12वीत टॉपरही होता. शिक्षणानंतर तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होता. CRPF भरतीसाठीही त्याने प्रयत्न केले होते; मात्र अपयश आले. सातत्याने नोकरी न मिळाल्याने तो मानसिक नैराश्यात गेला होता. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्याच्यावर मानसिक आजारावर उपचार सुरू होते. अलीकडेच तो नागपूर येथून वैद्यकीय सल्ला घेऊन परतला होता.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हत्येचे नेमके कारण सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
गावात शोककळा
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोक आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. धुर्वे कुटुंब शांत, साधे आणि कोणत्याही वादापासून दूर होते, त्यामुळे अशी घटना घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती, असे ग्रामस्थांनी सांगितले.
Web Summary : In Betul, Madhya Pradesh, a 30-year-old man, frustrated by joblessness, allegedly murdered his parents and brother. A child was critically injured. The accused was undergoing treatment for mental health issues. Police are investigating.
Web Summary : मध्य प्रदेश के बैतूल में बेरोजगारी से परेशान एक 30 वर्षीय युवक ने कथित तौर पर अपने माता-पिता और भाई की हत्या कर दी। एक बच्चा गंभीर रूप से घायल है। आरोपी मानसिक स्वास्थ्य समस्याओं का इलाज करा रहा था। पुलिस जांच कर रही है।