शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:45 IST

रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये दोन्ही आरोपींनी भारतीच्या नावावर २.५ लाख रूपयांची एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. आणि त्याच पैशांसाठी तिची हत्या करण्यात आली.

लुधियानाच्या हंबडा शहरातून आईच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अशी घटना ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. इथे एका स्वार्थी आईने आपल्या दुसऱ्या पतीसोबत मिळून आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मुलीची हत्या केली गेली तिचं नाव भारती आहे. या आईने आपल्या ९ वर्षीय मुलीची हत्या इन्शुरन्सच्या पैशांसाठी केली. ती २७ वर्षीय आई पिंकी आणि ३१ वर्षीय सावत्र वडील नरिंदरपालसोबत राहत होती.पिंकी तिच्या पहिल्या पतीपासन वेगळी झाली होती आणि नरिंदरपालसोबत राहू लागली होती. काही दिवसांनी दोघांनी लग्नही केलं. तेव्हा पिंकीची मुलगी भारतीचं वय ३ वर्षे होतं. १९ जूनला हंबडा गावातील एका फॅक्टरीमध्ये नेऊन दोघांनी मुलीचा गळा दाबला आणि यामुळे मुलीचा मृत्यू झाला.

रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये दोन्ही आरोपींनी भारतीच्या नावावर २.५ लाख रूपयांची एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. आणि त्याच पैशांसाठी तिची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी २०१९ मध्ये एक प्लॉट खरेदी केला होता आणि त्यासाठी इन्स्टॉलमेंटमद्ये पैसे भरत होते. त्यांनी १.४९ लाख रूपये बॅंकेला दिलेही होते. पण शिल्लक राहिलेल्या पैशांची सोय होत नव्हती. यानंतर दोघांनी हा प्लॅन केला. त्यांनी विचार केला की, मुलीची हत्या करून इन्सुरन्सचे पैसे घेतील आणि बॅंकेचं कर्ज फेडतील. नरिंदर कुमार आणि पिंकी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (हे पण वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार)

पोलिसांनुसार मुलीला ते ओझं समजत होतं. त्यामुळे तिला त्यांना काहीही करून रस्त्यातून हटवायचं होतं. आरोपींनी आधी तिचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला हार्ट अटॅक आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी मुलीचं पोस्टमार्टम केलं तेव्हा मृत्यूचं खरं कारण समोर आलं. ज्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, पिंकी आणि नरिंदर यांना एक मुलगाही आहे. ज्याचं वय सहा वर्षे आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी