उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये झालेल्या पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अर्शदला अटक केली आहे. अर्शद हा गुन्हेगार असून त्याने कुटुंबीयांच्या हत्येचा सुनियोजित कट रचल्याचं समोर येत आहे. पोलिसांना फसवण्यासाठी त्याने भलताच व्हिडीओ बनवला होता. पोलिसांना अर्शदच्या मोबाईलमधून अनेक व्हिडीओ सापडले आहेत जे आधीच रेकॉर्ड केलेले आहेत. या सर्व प्रकारामुळे हा कट आधीच रचला गेला असून पोलीस आता तपास करत आहेत.
हत्येनंतर आरोपी अर्शदने बनवलेल्या व्हिडिओमध्ये कॉलनीतील लोक त्याच्या कुटुंबाला त्रास देत होते आणि त्यामुळेच त्याने हत्या केल्याचं सांगितलं होतं. अर्शदने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. अर्शद आणि त्याच्या वडिलांनी मिळून कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अर्शदला अटक केली आहे पण त्याचे वडील अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदने आपल्या कुटुंबीयांची हत्या केल्यानंतर एक व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या परिसरातील लोकांवर छळ केल्याचा आरोप केला होता. पण आग्रा येथे केलेल्या तपासात लोकांनी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला गेला नसल्याचं समोर आलं आहे. अर्शद आणि त्याचे वडील परिसरात कोणाशीही बोलत नव्हते.
पोलिसांनी अर्शदचा मोबाईल जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स तपासत आहेत. ही हृदयद्रावक घटना दोनच दिवसांपूर्वी लखनौमध्ये उघडकीस आली होती. येथील एका हॉटेलमध्ये चार मुली आणि त्यांच्या आईचे मृतदेह सापडले आहेत. अर्शदनेच आपली आणि चार बहिणींची हत्या केली आहे.