शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

"डेटिंगवर खर्च केलेले ५०००० रुपये दे"; ब्रेकअपनंतरचा प्रेयसीसोबतचा वाद थेट उच्च न्यायालयात

By हेमंत बावकर | Updated: October 17, 2020 15:18 IST

Breakup ke Baad: प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. 

सूरत : मोफत भोजनासारखी कोणतीही गोष्ट असत नाही, असे म्हटले जाते. तसाच प्रकार गुजरातच्या मेहसाणामध्ये घडला आहे. या तरुणानुसार मोफत कॉफी किंवा भेटवस्तू सारखी कोणतीही गोष्ट नसते, असे त्याचे म्हणणे आहे. या तरुणाचा प्रेमभंग झाला. यामुळे या तरुणाने प्रेयसीकडून तिच्यासाठी डेटिंग आणि अन्य ठिकाणी फिरायला जाणे यावर केलेला खर्च मागण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रेमिकेने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावर त्रासलेल्या प्रेयसीने त्याच्याविरोधात जबरस्ती वसुली करण्याचा गुन्हा दाखल केला. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. 

प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सुरुवात एप्रिल 2018 मध्ये झाली होती. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. 

एका खास कार्यक्रमात तरुणाने त्याच्या प्रेयसीला सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र, तिने परिक्षा असल्याचे सांगत नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने तिच्यासोबत वाद घालत प्रेमसंबंध संपविले. यानंतर तरुणीने मार्च महिन्यातच पोलिसांकडे धाव घेतली होती व प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याकडे 50000 रुपये परत करण्याची मागणी सुरु केली. तर तरुणाने हे पैसे तिला फिरविण्यासाठी, डेटवर, जेवण-नाष्ट्यामध्ये खर्च झाले. प्रेयसीने विद्यार्थीनी असल्याने तिच्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगत हे पैसे देण्यास नकार दिला होता. यावर त्या प्रियकराने तिला फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणाने त्याचा नंबर ब्लॉक केला.काही दिवसांनंतर तिला एक धमकीचा मेसेज आला. जर पैसे परत केले नाहीत तर तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर काही दिवस त्या तरुणीने फोन बंद ठेवला. यानंतर त्या प्रियकराने तिच्याकडे 60000 रुपये मागितले. 

अखेर या त्रासाल कंटाळून प्रेयसी पोलीस ठाण्यात गेली आणि गुन्हा नोंदविला. आता या तरुणाने हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये त्याने प्रेयसीने लावलेल्या आरोपांना फेटाळले आहे. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसGujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालय