सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, भेटीगाठी वाढल्या, शारीरीक संबंधही प्रस्थापित झाले... पण जेव्हा प्रेयसीने याच प्रेमाला लग्नाचं नाव देण्याचा आग्रह धरला, तेव्हा प्रियकराचा चेहरा बदलला. लग्नाच्या दबावामुळे आणि समाजातील बदनामीच्या भीतीने एका नराधम प्रियकराने आपल्याच प्रेयसीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अनूपपूर जिल्ह्यातील जैतहरी परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
त्या दुर्गंधीने फुटलं भांडं
१५ मार्च रोजी गुंवारी गावातील एका पडक्या आणि ओसाड घराच्या परिसरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक नागरिक रामखेलावन राठौर आणि इतर ग्रामस्थांनी जेव्हा धाडस करून आत डोकावले, तेव्हा त्यांना एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह इतका विद्रूप झाला होता की त्याची ओळख पटवणे कठीण होते. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोती उर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली एफएसएल आणि क्राईम ब्रांचचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घड्याळ आणि पर्सने ओळख पटली!
तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेली पर्स, घड्याळ आणि बुटांवरून मृत तरुणीची ओळख २४ वर्षीय काजल (रा. लपटा) अशी पटली. काजल १७ मार्च रोजी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे जैतहरी येथील चंद्रभान राठौर याच्याशी प्रेमसंबंध होते.
लग्नाचा आग्रह ठरला जिवावर
फेसबुकवरून सुरू झालेली ही मैत्री गेल्या सहा महिन्यांपासून घट्ट झाली होती. आरोपी चंद्रभान आणि काजल गुपचूप भेटत असत. काजलने आता लग्नासाठी तगादा लावला होता आणि लग्न न केल्यास घरी सांगण्याची धमकी दिली होती. याच बदनामीच्या भीतीने चंद्रभानने तिला कायमचे वाटेतून हटवण्याचे कारस्थान रचले. १७ तारखेला त्याने तिला भेटण्याच्या बहाण्याने गुंवारी गावातील आपल्या नानांच्या निर्जन पडक्या घरात नेले.
चेहरा दगडाने ठेचला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपीने आधी काजलच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. ती खाली कोसळताच त्याने दगडाने तिचे डोके आणि चेहरा वारंवार ठेचला, जेणेकरून तिची ओळख पटू नये. या क्रूर कृत्यानंतर तो शांतपणे घरी परतला, मोबाईलमधील सिम तोडून टाकले आणि फोन एका दुकानात लपवून ठेवला. मात्र, पोलिसांच्या तपासापुढे त्याचे काहीही चालले नाही. पोलिसांनी हत्येत वापरलेली दुचाकी आणि मृतकाचा मोबाईल जप्त केला असून आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
Web Summary : Facebook love turned deadly in Anuppur. A man murdered his girlfriend after she insisted on marriage, fearing social shame. Police arrested him within 48 hours. He brutally killed her to prevent identification.
Web Summary : अनूपपुर में फेसबुक प्यार घातक साबित हुआ। शादी के दबाव और बदनामी के डर से एक आदमी ने अपनी प्रेमिका की हत्या कर दी। पुलिस ने 48 घंटे के भीतर उसे गिरफ्तार कर लिया। उसने पहचान रोकने के लिए बेरहमी से हत्या की।