शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीपासून प्रेम, तीन मुलांची आई प्रियकराच्या घरी पोहोचली; मागणी ऐकून घरचे शॉक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 20:18 IST

नऊ वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्याशीच लावून दिले होते. लग्न झाले तरी दोघांतील प्रेमसंबंध तसेच राहिले. लग्नानंतर तिला तिच्या पतीसोबतच रहायचे होते, पण...

बिहारच्या सिवानमध्ये एका धक्कादायक प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला आहे. एक विवाहित महिला तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यावर अडून बसली आहे. या महिलेने आपल्या घरी नाही तर प्रियकराच्या घरी जाऊन हायव्होल्टेज ड्रामा केला आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचे आहे. दोघांमध्ये खूप वर्षांपासून, लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. 

भगवानपुर हाट पोलीस ठाणे क्षेत्रातील हा प्रकार आहे. तीन मुलांची आई असलेली विवाहित महिला बदरजमी गावाच्या कमलेश महतोच्या घरी अचानक पोहोचली. सोबत दीड वर्षांचा मुलगा होता. तिने तिथेच ठाण मांडले आहे. प्रियकराशी लग्न करायचे असल्याची मागणी ती करत आहेत. यामुळे प्रियकरासह त्याचे कुटुंबीय घर बंद करून पळून गेले आहेत. 

महिलेच्या दाव्यानुसार तिचे आणि कमलेशचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध आहेत. मात्र, नऊ वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्याशीच लावून दिले होते. लग्न झाले तरी दोघांतील प्रेमसंबंध तसेच राहिले. लग्नानंतर तिला तिच्या पतीसोबतच रहायचे होते. मात्र, तेव्हा कमलेश तिला मोबाईलवर फोन करून बदनामी करण्याची धमकी देत होता. यामुळे लग्नाच्या नऊ वर्षांनंतरही त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले आहेत, असे तिचे म्हणणे आहे. 

मोठा मुलगा आठ वर्षांचा आहे, तर आणखी एक पाच वर्षांची मुलगी आहे, असे तिचे म्हणणे आहे. १७ नोव्हेंबरला कमलेश तिच्या सासरी आला आणि भेटण्यासाठी बोलवले होते. ती आडोशाला त्याला भेटायला गेली होती, तेव्हा आजुबाजुच्या लोकांनी तिला त्याच्यासोबत पाहिले आणि पकडून धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशी प्रकरणा मिटवून त्याला सोडण्यात आल्याचे, तिने म्हटले आहे. आता पकडले गेल्याने सासरचे आणि माहेरचेही घरात घेत नाहीएत. यामुळे मला कमलेश सोबत लग्न करायचे असल्याचे तिने म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारmarriageलग्न