शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली कागदपत्रे साडेपाच वर्षांनी मिळाली; ठाणे रेल्वे प्रशासनाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:35 IST

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली.

ठाणे : तब्बल साडेपाच वर्षांपूर्वी हरवलेल्या एका प्लास्टिक पिशवीतील शैक्षणिक प्रमाणपत्रांसह महत्त्वाची कागदपत्रे ठाणे रेल्वे प्रशासनाने संबंधित केरळ येथील प्रवासी महिलेचा शोध घेऊन तिला बुधवारी सुपूर्द केली. ही महिला मूळची मुंबईतील रहिवासी असून लग्नानंतर ती केरळची रहिवासी झाली आहे.

एका अनोळखी प्रवाशाने ठाणे रेल्वेस्थानकाचे तत्कालीन उपप्रबंधक लक्ष्मण दास यांच्याकडे २०१५ मध्ये रेल्वे प्रवासात मिळालेली एक प्लास्टिकची पिशवी आणून दिली. त्यामध्ये रेजिमोल कुंजप्पन या महिलेची महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळले. पिशवीत काही दूरध्वनी क्रमांक दास यांना मिळाले. त्यापैकी एकही क्रमांक कुंजप्पन यांचा नव्हता. कागदपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन दास यांनी कुंजप्पन यांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. दरम्यान, कुंजप्पन यांचा क्रमांक मिळाल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना कागदपत्रांबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आपण केरळ येथे असून मुंबईत परत येऊ तेव्हा संपर्क करून ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु, साडेपाच वर्षांत त्यांचे मुंबईत येणेच झाले नाही. त्यातच, नोव्हेंबर २०२० मध्ये त्या मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनी दास यांच्याशी संपर्क करून आपल्या हरवलेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन ती त्यांच्याकडून परत मिळवली. त्यावेळी, त्यांनी रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले.  

जन्म दाखला, सिनिअर केजीपासून बी. कॉम या कागदपत्रांसह एटीएमकार्ड, चेकबुक, छायाचित्र आदी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. त्यामुळेच कुंजप्पन यांच्याशी संपर्क साधला. आठ महिन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खातरजमा करून ती त्यांना परत केली.  - लक्ष्मण दास, तत्कालीन उपप्रबंधक,     ठाणे रेल्वेस्थानक

 

टॅग्स :railwayरेल्वे