शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात मोठी फसवणूक; 26 लाख रुपये गमावल्याने व्यावसायिकाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:10 IST

Crime News : कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूपासून 60 किमी दूर असलेल्या चिक्कबल्लापुरा  येथील आहे.

बंगळुरू :  कर्नाटकात 1 रुपयाच्या जुन्या नाण्याच्या बदल्यात एका व्यावसायिकाची 56 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. यानंतर या व्यावसायिकाकडून 26 लाख रुपये उकळण्यात आले. या फसवणुकीने दुखावलेल्या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूपासून 60 किमी दूर असलेल्या चिक्कबल्लापुरा  येथील आहे. अरविंद नावाच्या एका छोट्या व्यावसायिकाकडे 6 दशकापूर्वीचे जुने 1957 चे 1 रुपयाचे नाणे होते. जुन्या नाण्यांच्या ऑनलाईन लिलावात चांगले पैसे मिळतात असे त्यांनी ऐकले होते. त्यामुळे ऑनलाइन लिलावासाठी (Online Auction) त्यांनी आपली नाणीही कोणत्यातरी वेबसाइटवर टाकली. यादरम्यान ते फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकले.

दरम्यान, अरविंद यांचे चिक्कबल्लापुरा येथे गिफ्ट शॉप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणार्‍याने अरविंदशी फोनवरून संपर्क साधला आणि नाणे खरेदी करण्यात रस दाखवला. त्याने अरविंदला नाण्याचे चित्र पाठवायला सांगितले. त्यानंतर त्याने सांगितले की, या नाण्याच्या बदल्यात 56 लाख रुपये देऊ शकतो. अरविंद यांनी हे मान्य केल्यावर त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली काही खात्यात 2 हजार जमा केले. त्यानंतर वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पैसे मागत राहिले. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्याने 26 लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर एके दिवशी त्याचा फोन बंद आला.

फसवणूक करणाऱ्याला पैसे देण्यासाठी अरविंदने पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. मित्रांकडून कर्जही घेतले. मात्र, याबाबत अरविंद यांनी आपल्या पत्नीला  काहीच सांगितले नव्हते. त्यामुळे या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का सहन झाली नाही. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अरविंद यांना वाटले की आपल्याजवळ काहीच उरले नाही, तेव्हा त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

अरविंद हे शहराबाहेर एका निर्जन ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी आपली स्कूटर एका मंदिराजवळ उभी केली. त्यानंतर स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला व्हॉट्सअॅप मेसेजही पाठवला होता. मात्र त्यांच्या मित्रांना व्यस्ततेमुळे रात्री मेसेज पाहता आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अरविंद यांचे निधन झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी