शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुडचडेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दुकान लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 16:32 IST

सुदैवाने सोन्याचे दागिने लॉकरमध्ये असल्याने सुरक्षित राहिले; मात्र दीड लाखांची चांदी मात्र पळवली

मडगाव - गोव्यात सगळीकडे दिवाळीची धामधूम चालू असतानाच मडगावपासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे येथील अशोक कोलवेकर यांच्या सराफी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे दीड लाखांची चांदी लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ते ठिकाण कुडचडेच्या पोलीस चौकीपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. यातील सुदैवाची गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने चोरटे त्यांना हात लावू शकले नाहीत. या घटनेने संपूर्ण कुडचडे शहरात व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ती जागा कुडचडे बाजारपेठेत जरी असली तरी रात्री 9 नंतर या भागात तसा शुकशुकाटच असतो. याच स्थितीचा फायदा चोरटय़ांनी उठवून ही चोरी केली. या चोरीत सुमारे दीड लाखांचे चांदीचे ऐवज दुकानात कपाटातच ठेवण्यात आले होते ते चोरटय़ांनी पळवले. याच दुकानाच्या बाजूला एक क्लिनीक असून चोरटय़ांनी सुरुवातीला या क्लिनीकच्या भिंतीला मागच्याबाजूने भगदाड पाडले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर या क्लिनीकला लागून असलेल्या सराफी दुकानात क्लिनीकच्या भिंतीला भोक पाडून ते आत शिरले. आत शिरण्यासाठी त्यांनी क्लिनीकमध्ये असलेल्या टॉर्चचा वापर केल्याचेही उघड झाले आहे. चोरटय़ांनी कपाटातील सगळा ऐवज लंपास केला. मात्र सोन्याचे दागिने लॉकरमध्ये असल्याने ते सहीसलामत राहिले.वास्तविक कोलवेकर यांचे दुकान शनिवारी बंद असते. शनिवारी सकाळी ही चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर बाजारपेठेतील व्यापा:यांनी कोलवेकर यांना फोनवरुन चोरीची माहिती दिल्यानंतर ते दुकानात आले. मात्र या चोरीत आपले सोन्याचे दागिने सहीसलामत राहिल्याने या दु:खाच्या स्थितीतही त्यांनी समाधानाचा श्र्वास सोडला. असे जरी असले तरी कुडचडेतील इतर व्यापा:यांसाठी मात्र हा चोरीचा प्रकार भितीदायकच ठरला. कुडचडे पोलिसांनी घटनास्थळावर येऊन नंतर पंचनामाही केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा