शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील रहिवाशांना लुटणारे रॅकेट उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 16:25 IST

गुन्हे शाखेची कारवाई : सानपाडा येथे भाडोत्री जागेत चालायचे कॉलसेंटर

ठळक मुद्देकॉलसेंटरमध्ये काम केले असल्याने त्याच्याकडे अमेरिकेतील नागकिरांचे फोन नंबर होते. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे.

नवी मुंबई - इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना कॉल करुन खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लुटणारे रॅकेट उघड झाले आहे. त्यांच्याकडून सानपाडा येथे भाडोत्री जागेत अनेक दिवसांपासून कॉलसेंटर चालवले जात होते. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाने यापूर्वी कॉलसेंटरमध्ये काम केले असल्याने त्याच्याकडे अमेरिकेतील नागकिरांचे फोन नंबर होते.सानपाडा सेक्टर 11 येथील एलोरा फिस्टा टॉवरमध्ये भाडोत्री जागेत कॉन्सीअर्ज हेल्प केअर सोल्युशन सव्र्हिसेस नावाने हे कॉलसेंटर चालवले जात होते. ट्रॉम्बे येथे राहणारया मन्सुर अली कासीम शेख (29) याच्याकडून हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्याठिकाणावरुन इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना फोन करुन त्यांच्या संगणक अथवा लॅपटॉपमध्ये वायरस असल्याची माहिती दिली जायची. त्यानंतर तो वायरस काढण्याच्या बहाण्याने संगणकाचा रिमोट ऍक्सेस स्वत: कडे घेतला जायचा. त्यानंतर संगणकातील महत्वाची माहिती मिळवून त्या व्यक्तीचा अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले जायचे. त्यानंतर संभाव्य कारवाईची भीती दाखवून खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. हि कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकलळी जात होती.या बनावट कॉलसेंटरची माहिती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक राणी काळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपआयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरिक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला असता, या बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड झाला. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सुर शेख याच्यासह मोहम्मद साजीद मोहम्मद जुनेद शेख (29), मोहम्मद जहिर साईमोहम्मद शेख (32), मोहम्मद फरहान मोहम्मद तसदिक शेख (28) व मुतरुझा अख्तर मोटारवाला (30) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आजवर किती जणांना लुटले आहे, याचा निश्चित आकडा उघड झालेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकAmericaअमेरिकाNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसInternetइंटरनेट