शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपाठीविरोधात लूक आउट नोटीस; अंगडिया वसुली प्रकरण : आरोपपत्र दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:52 IST

त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे; तर, गुन्हे शाखेने शुक्रवारी त्रिपाठींचे मेहुणे जीएसटी साहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा आणि नोकर पप्पुकुमार गौड यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती. त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यावसायिकांना अटकाव करीत खंडणी उकळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.  या प्रकरणी निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी आणि त्यांच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल आहे. मात्र ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.  

गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर पुरवणी आरोपपत्रात ते मिश्रा आणि गौड यांच्या कथित भूमिकेबद्दल पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

 अहवालासहित महत्त्वपूर्ण माहिती आठवड्याच्या सुरुवातीला तीन पोलिसांची जामिनावर सुटका झाली होती, तर मिश्रा आणि गौड सध्या कारागृहात आहेत. अंगडियाकडून घेतलेले पैसे त्रिपाठीने मिश्राकडे पाठविले होते. त्यानुसार, आतापर्यंत जप्त केलेले पुरावे, जबाब, तसेच ओळख परेडच्या अहवालासहित अनेक  महत्त्वपूर्ण माहितीचा या आरोपपत्रात समावेश आहे.

टॅग्स :Policeपोलिस