शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईने ५ वर्षीय मुलीची १५ वेळा चाकूने वार करत केली हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 13:33 IST

'द सन'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांवरून समजलं की, सुथा शिवनाथमने आपल्या पाच वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली.

ब्रिटनची राजधानी लंडनमधून एक हैराण करणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या ५ वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली. ३६ वर्षीय सुथा शिवनाथमला या अमानविय कृत्यासाठी पोलिसांनी अटक केली असून तिची कोर्टात सुनावणी सुरू आहे.

का केली मुलीची हत्या?

'द सन'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांवरून समजलं की, सुथा शिवनाथमने आपल्या पाच वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली. कारण तिच्या मनात भीती होती की, तिला कोरोनाची लागण होणार आणि ती कोरोनामुळे मरणार. त्यानंतर तिला वाटलं की, असं झालं तर तिची मुलगी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. (हे पण वाचा : आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा)

चिमुकलीवर १५ वेळा केले वार

मीडिया रिपोर्टनुसार, सुथा शिवनाथमने आपल्या दक्षिण लंडनमधील फ्लॅटच्या बेडरूममध्ये मुलगी सयागी शिवनाथमवर १५ वेळा चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर सुथाने स्वत:वरही चाकूने वार केले. शेजाऱ्यांनी दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं.

काय म्हणाले मुलीचे वडील?

कोर्टात सुनावणी दरम्यान मुलीचे वडील सुगंथन शिवनाथम यांनी सांगितलं की, कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे त्याच्या पत्नीवर वाईट प्रभाव पडला. ते म्हणाले की, तिला भीती होती की, तिला कोरोना होणार आणि ती मरणार. हे सांगत असताना ते जोरजोरात रडू लागले होते. 

कोर्टात सादर कागदपत्रांनुसार, सुथा शिवनाथम आणि सुगंथनचं २००६ साली अरेंज मॅरेज झालं होतं. त्यानंतर ती पतीसोबत लंडनमध्ये राहत होती. मात्र, तिला इंग्रजी बोलता येत नव्हतं. (हे पण वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार )

मानसिक आजाराची शिकार

सुथा शिवनाथमवर उपचार करणाऱ्या एका मनसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं की, 'कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच सोशल आयसोलेशनमुळेही लोकांना गंभीर रूपाने मानसिक आजारी केलं आहे'. तेच सुथाचे पती म्हणाले की, 'या घटनेनंतर ते अजून पत्नीसोबत बोलले नाहीत. पण मला माहीत आहे की, ती यासाठी जबाबदार नाहीये. मला माहीत आहे जर ती बरी असली असती तर आमच्या मुलीला तिने कधी मारलं नसतं'. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी