शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

लोकमत इम्पॅक्ट: तरुणाच्या डोळ्यावर लोखंडी वस्तू मारणाऱ्या पोलिसाचं निलंबन, हेमंत नगराळेंची तातडीनं कारवाई

By पूनम अपराज | Updated: February 19, 2022 19:19 IST

Suspension Of Police :याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तातडीने लोकमतने दिलेल्या बातमीची दखल घेऊन सुमित गायकवाडचे पोलीस दलातून निलंबन केलं

पूनम अपराज 

मुंबई - दादर येथील शिवाजी पार्क परिसरात अतिशय भयंकर घटना घडली आहे. खाकीला वर्दीला लाजवणारी घटना एका पोलिसाने घडवून आणली आहे. शिवाजी पार्क येथील कॅटरिंग कॉलेजसमोर असलेल्या रतिलाल गिरीधर हाऊस येथे राहणाऱ्या वैभव ठाकूर (३६) या तरुणाला पोलीस कर्मचारी सुजित गायकवाड याने लोखंडी वस्तू उजव्या डोळ्यावर मारली. त्यानंतर वैभवचा चष्म्याच्या काचा उजव्या डोळ्यात आरपार गेल्याने डोळा रक्तबंबाळ झाला. या डोळ्याची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की, डोळा निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात वैभवचा चुलत भाऊ रोहन आणि पोलीस कर्मचारी सुमित गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तातडीने लोकमतने दिलेल्या बातमीची दखल घेऊन सुमित गायकवाडचे पोलीस दलातून निलंबन केलं आणि याबाबत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.  

 

दादर सारख्या गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे घटना घडल्याप्रकरणी लोकमतने सर्वप्रथम बातमी दिली आणि या बातमीची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दखल घेऊन संबंधित पोलिसाचेनिलंबन करून कारवाईचे आदेश दिले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी सुमित गायकवाड हा विशेष पोलीस विभागात कार्यरत होता. 

भयंकर! मुंबईत पोलिसानं तरुणाच्या डोळ्यावर मारली लोखंडी वस्तू, चष्म्याच्या काचा घुसल्या आरपार

नेमकी काय घडली घटना?

१४ फेब्रुवारी रोजी वैभव हा बँकेत कामानिमित्त गेला होता. त्यानंतर अर्ध्या तासात वैभव घरी परतला. त्यावेळी वैभवच्या आईने चुलत भाऊ रोहन ठाकूर आणि त्याचा मित्र तिला शिवीगाळ करून रागाने बघत असल्याची तक्रार केली. त्यावर वैभवच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजच्या ठिकाणी रोहन उभा होता. त्याला वैभवने माझ्या आईकडे रागाने का बघत आहेस आणि तिला शिवीगाळ का करीत आहेस. तसेच आईवर दबाव का आणीत आहेस असा जाब विचारला. त्यावेळी रोहन वैभवला पाठीमागून मिठी मारून घट्ट पकडले आणि त्याचा मित्र सुमित गायकवाडने हातातील लोखंडी वस्तूने उजव्या डोळ्यावर प्रहार केला. वैभवच्या डोळ्यावरील चष्मा फुटून त्याच्या काचा उजव्या डोळ्यात आरपार गेल्या. रक्तबंबाळ डोळा घेऊन वैभवने शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठलं. मात्र, तिथे भेटलेल्या पोलीस उपनिरीक्षक अरुण यादव यांनी त्याच्यासोबत वैद्यकीय उपचारासाठी कोणत्या पोलिसाला न पाठवता. तू डोळ्यावर उपचार करून येण्यास सांगितले. 

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या गल्लीत बाईकस्वारांकडे वैभवने डोळ्यास वेतना होत असून हॉस्पिटलपर्यंत लिफ्ट मागितली. मात्र, एका वयस्कर इसमाने वैभवला लिफ्ट दिली आणि पोर्तुगीज चर्चनजीक असलेल्या जैन हेल्थ सेंटरला सोडले. डोळ्याला जबर मार लागल्याने जैन हेल्थ सेंटरमधून प्रथमोचार देऊन डॉक्टरांनी परळ येथील बच्चूअली चॅरिटेबल रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून एक ऑपरेशन केले. डॉक्टरांनी डोळ्याच्या बुबुळात काचा गेल्याने आणि जबर मार लागल्याने फ्रॅक्चर असल्याचे सांगितले असल्याची माहिती तक्रारदार वैभव ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना दिली. अजून चार ते पाच सर्जरी करायला लागणार असून डोळ्याने दिसेल की नाही याबाबत खात्री नाही, डोळा निकामी होण्याची शक्यता असल्याचं पुढे वैभव यांनी सांगितले. 

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी भादंवि कलम ३२४, ३३७, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. यावर संतप्त झालेल्या वैभव यांची आई यांनी लोकमतशी बोलताना खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की, जर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थ्या हातात घेऊन त्याचे तीन तेरा वाजवले तर आम्ही सुरक्षित कसे राहणार. मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला न्याय देण्याऐवजी पोलीस माझ्या मुलावर दबाव आणत आहेत. महत्वाचं गुन्हा घडला १४ फेब्रुवारीला आणि ५ दिवसांनी पोलीस घटनास्थळी पाहणी करण्यास आले. माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेने आमचे सरंक्षण करावे ही मी पोलीस आयुक्त यांना विनंती करते. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, संबंधित पोलीस विशेष शाखेत कार्यरत असून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर कोर्टाने जामिनावर त्यांची सुटका केली आहे. पुढे आम्ही योग्य ती कारवाई करू. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsuspensionनिलंबन