शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विदारक परिणाम! आधीच कर्जबाजारी त्यात लॉकडाऊन; त्याच्यावर आली पोटच्या मुलाला विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 16:10 IST

Crime news: साईनाथ भोईर हा मूळचा मुरबाडचा आहे. तो सध्या शहाड येथे राहतो. रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि सहा मुले आहेत.

कल्याण- आधीच तो कर्जबाजारी होता. त्यात लॉकडाऊन सुरु असल्याने त्याचा रिक्षाचा धंदा होत नव्हता. त्याच्यावर पत्नी आणि सहा मुलांचा बोजा असताना त्याच्या संपर्कात एक महिला एजंट आली. तिने त्याच्याकडून पाच महिन्याचा मुलगा विकत घेतला. याची कुणकुण ठाणो मानवी तस्करी विराेधी पथकाला लागली होती. या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशनला सापळा रचून आई वडिलांसह महिला एजंटला अटक केली आहे. या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. (Police arrest three people in human trafficing.)

साईनाथ भोईर हा मूळचा मुरबाडचा आहे. तो सध्या शहाड येथे राहतो. रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि सहा मुले आहेत. सहा मुलांपैकी तीन मुली आणि तीन मुलगे आहेत. मागच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊन सुरु होण्याआधीच साईनाथवर कर्ज होते. त्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने कुटुंबाचा घर खर्च कसा भागवायचा हे त्याच्यासमोरचे मोठे आव्हान होते. लॉकडाऊनमुळे तो आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या संपर्कात मानसी जाधव नावाची महिला आली. मानसी ही बदलापूर येथे राहते. ती सामाजिक संस्थेत कामाला होती.

मानसीने साईनाथला त्याचा पाच महिन्याचा मुलगा विकत मागितला. त्या बदल्यात साईनाथला ९० हजार रुपये देण्याचे कबूल केले. मानसीला या मुलासाठी दुसऱ्याकडून २ लाख रुपये मिळणार होते. मानसी, साईनाथ आणि त्याची पत्नी मुलाला घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील दीपक हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मानवी तस्करी विरोधी विभागाच्या ठाणे कार्यालयास मिळाली. या विभागाचे अधिकारी अशोक कडलक यांनी सापळा रचून मानसी, साईनाथ व त्याची पत्नी या तिघांना अटक केली आहे. त्यांना महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले आहे.

मानसी मुले खरेदी विक्रीच्या मानवी तस्करीचा व्यवहार किती दिवसापासून करीत आहे. ती हा मुलगा कोणाला दोन लाख रुपयात विकणार होती. या विविध अंगाने पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसkalyanकल्याण