शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पॉवरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 20:04 IST

Locals beat Torrent Power employees: थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शन यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व धक्काबुक्की तसेच मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.

भिवंडी - थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शन यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व धक्काबुक्की तसेच मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Locals beat Torrent Power employees who went to cut off power supply; Death of one employee)

तुकाराम पवार ( वय ५५ वर्ष , रा. काटेमानीवली कल्याण ) असे जमावाच्या मारहाण व धक्काबुक्कीत मृत्यू झालेल्या टोरंट पावर कर्मचाऱ्याचे नाव असून ते टोरंट पावरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी काटई गावातील घरत कंपाउंड येथे वीज चोरी व थकीत वीज मीटरवर कारवाई करण्यासाठी टोरंट पावरचे कर्मचारी गेले असता येथील स्थानिक नागरिकांनी टोरंटच्या या कारवाईस विरोध केला व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की , मारहाण केली . या मारहाणीत टोरंटचे सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान मयत तुकाराम पवार यांची मुले आकाश पवार व प्रकाश पवार या दोन्ही मुलांनी दोषींवर कारवाई करावी व नुकसान भरपाई मिळावी तसेच टोरंट पावर प्रत्येक कारवाई दरम्यान मोठा पोलीस फाटा घेऊन जात असते मात्र आजच्या कारवाई वेळी असा कोणताही पोलीस संरक्षण का घेतला नाही त्यामुळे टोरंट पावर देखील या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप पवार यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे.

तर टोरंट पावर नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत असते आज झालेली घटना दुर्दैवी असून नागरिकांना जर काही अडचण किंवा शंका असेल तर त्यांनी कार्यालयात यावे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी टोरंट पावर तर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात टोरंटच्या वतीने मारहाण करणाऱ्या इसमा विरोधात तक्रार करण्यात आली आहे. मात्र शवविच्छदन अहवाला नंतर संबंधितांवर पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती टोरंट पावरचे जन संपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी