शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:41 IST

अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भायखळा पोलिसांनी या प्रकरणी धमकाविल्याचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.भायखळा परिसरात अहमद अन्सारी (४२) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्याकडे स्वीय साहाय्यक म्हणून नोकरी करतात. भायखळा पूर्वेकडील ई. एस. पाटणवाला रोड परिसरात बांधकाम व्यावसायिक इस्लाम कुरेशी, जमील कुरेशी आणि मुनाफ वडगामा यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची लेखी तक्रार काही दिवसांपूर्वी पठाण यांच्याकडे आली होती. त्यानुसार, पठाण यांच्या सांगण्यावरून अन्सारी यांनी याबाबत पालिकेत तक्रार दिली.याच दरम्यान, २९ सप्टेंबरला त्यांना समीर नावाच्या व्यक्तीने फोन केला व भेटायचे असल्याचे सांगितले. काही वेळातच समीर परब आणि त्याचा साथीदार सुलतान तेथे धडकला.‘आप हमारी बिल्डिंग पर जो कारवाई करना चाह रहे हो, वो बिल्डिंग किसकी है, वो आपको मालुम नही. जो मालीक है, वो अमरिका में बैठा है, तुमको मालुम नही हम क्या कर सकते है?’ असे धमकावण्यास सुरुवात केली. तसेच या इमारतीच्या प्रकल्पासाठी अनेक भार्इंचे पैसे लागल्याचे सांगून, अन्सारीला धमकावले. तक्रार मागे नाही घेतली, तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली; आणि दोघेही दुचाकीवरून निघून गेले.या घटनेमुळे अन्सारी यांना धक्का बसला असून, त्यांनी कार्यालयात जाणे टाळले. सोमवारी त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली.पोलीस तपास सुरूया प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी