शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 8:46 PM

सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशान्वये संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : बनावट दागिने देत सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश राजेश जळगावकर (रा.पौर्णिमा स्टॉपजवळ) असे संशयिताचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरेश बाबुलाल शाह (रा.गंजमाळ) यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार ५ मे, २०२० रोजी संशयित अंकुश याने सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर फिर्यादी शाह यांनी संशयिताकडे मुद्दल व व्याजाची मागणी केली असता, त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी शाह यांनी २५ जुलै, २०२० ते दागिने विक्रीसाठी सराफाकडे नेले असता, दागिने बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, शाह यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. मात्र, त्यानुसार तेथे अदाखलपात्र गुन्हा नोंदविला गेल्याने शाह यांनी न्यायालयात अर्ज दिला. त्यामुळे न्यायालयाने आदेशित केल्यानंतर सोमवारी (दि. ११) संशयित अंकुशविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCourtन्यायालयfraudधोकेबाजीGoldसोनं