शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई पोलिसांकडून लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड; चीनच्या दोन नागरिकांसह चार जणांना अटक

By जयदीप दाभोळकर | Updated: January 3, 2021 11:04 IST

चारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज, तसंच रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी

ठळक मुद्देचारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात देत होते कर्ज रक्कम भरण्यासाठी दिली जात होती धमकी

तामिळनाडू पोलिसांनी लोन अ‍ॅप रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी चीनच्या दोन नागरिकांसहित चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी अ‍ॅपद्वारे अधिक व्याजदरात कर्ज देत होते आणि ते वसूल करण्यासाठी धमकीचे फोनही करत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन कर्ज देणं आणि फोनवरून धमक्या देण्याच्या एका तक्रारीवरून चेन्नईच्या सेंट्रल क्राईम ब्रान्चनं एक तपास सुरू केला होता. "लॉकडाउनमुळे आपण आर्थिक संकटात सापडलो होतो. सोशल मीडियावरील एका जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला एम रूपया या अ‍ॅपबद्दल माहिती मिळाली. तसंच हे त्वरित कर्ज देणारं अ‍ॅप होतं," अशी माहिती तक्रारदारानं पोलिसांना दिली. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्यानं या अ‍ॅपच्या मदतीनं ५ हजार रूपयांची रक्कम घेतली. तसंच यासाठी त्याच्याकडून १५०० रूपये व्याज म्हणून आकारण्यात आले. यानंतर त्याच्याकडून १०० रूपयांवर २ टक्क्यानं व्याज घेण्यात आलं. त्यानंतर धमकीचे फोनही येऊ लागल्याचं तक्रारकदारां सांगितलं. यानंतर चेन्नई क्राईम ब्रान्चनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. तसंच अनेक ऑनलाइन स्वाक्षऱ्यांच्या आधारावर, आरोपींच्या बंगळुरूतील एका कॉल सेंटरबाबत माहिती मिळाली. हे कॉल सेंटर कॉल टू किंडल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, प्रमोदा आणि पावन द्वारे चालवलं जात होतं. यामध्ये जळपास ११० जण कार्यरत होते. हे कर्मचारी ९ निरनिराळ्या अ‍ॅपवरून लोन देण्याचं काम करत असल्याचंही तपासातून समोर आलं. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या लोकांना त्यांच्याकडून लक्ष्य केलं जात होतं. हे लोकं त्यांना अधिक व्याजदरावर कर्ज देत असतं आणि पैसे पुन्हा भरण्यासाठीही फोनद्वारे धमकी दिली जात होती. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर प्रमोदा आणि पावननं कथितरित्या दोन चिनी नागरिकांसाठी काम करत असल्याचं कबूल केलं. सध्या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

टॅग्स :chinaचीनChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा